Advertisement

काळ्या फिती लावून सीमावासीयांना पाठिंबा- एकनाथ शिंदे

१ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडी सरकारमधील (maha vikas aghadi government) सर्व मंत्री काळ्या फिती लावून काम करणार आहेत.

काळ्या फिती लावून सीमावासीयांना पाठिंबा- एकनाथ शिंदे
SHARES

सीमा भागात राहणाऱ्या मराठी बांधवांवर कर्नाटक सरकारकडून होणाऱ्या अत्याचाराचा निषेध म्हणून १ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडी सरकारमधील (maha vikas aghadi government) सर्व मंत्री काळ्या फिती लावून काम करणार असल्याचं राज्याचे नगरविकासमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी सांगितलं.

१ नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्याची स्थापना झाली होती. तेव्हापासून महाराष्ट्र-कर्नाटक (maharashtra-karnataka border issue) सीमा भागात राहणाऱ्या ८६५ गावांमधील मराठी भाषिकांवर कर्नाटक राज्य सरकारकडून सातत्याने अन्याय, अत्याचार होत आहे. भाषावार प्रांत रचनेमुळे बेळगाव हा महाराष्ट्राचा भाग कर्नाटकमध्ये गेल्याने १ नोव्हेंबर हा काळा दिवस पाळला जातो. त्याचा निषेध म्हणून सीमा भागातील मराठी भाषिक ५७ सालापासून १ नोव्हेंबर हा दिवस काळा दिवस (black day) म्हणून पाळतात, त्याला राज्य सरकारकडून देखील पाठिंबा देण्यात येणार आहे. (maha vikas aghadi government support black day against karnataka)

हेही वाचा- शरद पवारांकडे 'हर मर्ज की दवा'! शिवसेना नेत्याचा राज ठाकरेंना टोला

याबाबत अधिक माहिती देताना एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी महाराष्ट्र सरकार (maharashtra government) समर्थपणे उभं आहे. त्यासाठी राज्य सरकारमधील सर्व मंत्री १ नोव्हेंबर रोजी काळी फित लावून कारभार करणार आहे. सीमा भागातील ८६५ गावात राहणारे मराठी भाषित महाराष्ट्रात सामील होण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न करत आहेत. परंतु कर्नाटक सरकार सातत्याने दडपशाही करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार करत आहे. या दडपशाहीचा निषेध म्हणून सीमावासीयांकडून १ नोव्हेंबरला काळा दिवस पाळण्यात येतो. त्यांच्या पाठिशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राज्य सरकार ठामपणे उभं आहे. 

हा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून न्यायालयीन पातळीवर सर्वोपतरी प्रयत्न करण्यात येत आहेत. सीमावासीयांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे ही राज्य सरकारची भूमिका आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सीमावासीयांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याला मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार सर्व मंत्री १ नोव्हेंबरला काळी फित लावून काम करणार आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांच्या वतीने पत्र जारी करून सीमावासीयांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचा- दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना थकित वेतन मिळणार?

संबंधित विषय
Advertisement