Advertisement

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता

मंत्रिमंडळात भाजपच्या 8 आणि शिंदे गटाच्या 7 आमदारांचा समावेश असणार असल्याचं सांगितलं जात आहे.

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता
(File Image)
SHARES

शिंदे आणि भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा उद्या म्हणजेच मंगळवारी विस्तार होण्याची शक्यता आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

हा संपूर्ण विस्तार असणार नाही. पण पहिल्या टप्प्यातील विस्तार असणार आहे. या पहिल्या टप्प्यात साधारण 12 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

यावेळी एकूण 12 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात भाजपच्या 8 आणि शिंदे गटाच्या 7 आमदारांचा समावेश असणार असल्याचं सांगितलं जात आहे.

तसेच येत्या 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान राज्याचं पावसाळी अधिवेशन (monsoon session) पार पडणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. त्यामुळे या अधिवेशनापूर्वीच म्हणजे उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. उद्या मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर संध्याकाळीच मंत्र्यांना खाते देण्यात येणार आहे. त्यानंतर बुधवारी कॅबिनेटची बैठकही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी नुकतीच दिल्लीवारी केली आहे. आज दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.

मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार आहे. काही नावावर फेर विचार करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक सुरू आहे. सध्याच्या राजकीय घड़ामोड़ीमुळे काही नावावर फेरविचार होऊ शकतो.

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले होते. फडणवीस यांनी दिल्लीत जावून भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली होती. पक्षश्रेष्ठींना महाराष्ट्रात आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात पॅटर्न अवलंब करायचा आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.



हेही वाचा

संजय राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा