Advertisement

संजय राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात आले होते.

संजय राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी
SHARES

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना आणखी 14 दिवस न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे.

गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यांची 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. आज कोठडी संपत असल्यानं राऊत यांना कोर्टात करणार हजर करण्यात आले. यावेळी ईडीने संजय राऊत यांची कोठडी मागितली नाही. त्यामुळे कोर्टाने राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

तसंच संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडीत औषधं देण्याची परवानगी द्यावी आणि घरातील जेवण देण्याची मागणी करण्यात आली आहे. राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असल्याने परवानगी द्यावी ही विनंती वकिलांनी केली असून आर्थर रोड कारागृह अधीक्षकांना सूचना द्यावी, अशी विनंती करण्यात आली.

न्यायालयाने संजय राऊत यांच्या वकिलांच्या मागण्या मान्य केल्या आहे. संजय राऊत यांच्या मेडिकल हिस्ट्रीचे कागदपत्रे CMO चीफ मेडिकल ऑफिसर यांना सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे.

दरम्यान, ईडीच्या कोठडीत असताना सुद्धा संजय राऊत यांच्या नावाने शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून लेख छापून आला. या लेखाची ईडी चौकशी करणार आहे. मागील 8 दिवसांपासून संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत आहे, त्यामुळे कोठडीत असताना रविवाराच्या सामनाच्या अंकात रोखठोक सदर कुणी लिहिला याची चर्चा रंगली आहे.हेही वाचा

केदार दिघेंच्या अडचणीत वाढ, बलात्कार पीडितेला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा