Advertisement

महिन्याभरात ३०० शेतकऱ्यांची आत्महत्या, नेते मात्र सत्तासंघर्षात मग्न

. गेल्या ४ वर्षात एका महिन्यात झालेल्या शेतकरी आत्महत्यांमधील ही सर्वाधिक संख्या

महिन्याभरात ३०० शेतकऱ्यांची आत्महत्या, नेते मात्र सत्तासंघर्षात मग्न
SHARES

विधानसभेच्या निवडणूकीचे निकाल लागून महिना उलटला तरी, खाते वाटपावरून तिन्ही पक्षात अद्याप एकमत झालेले नाही. कधी वजनदार खात्यावरून तर कधी शासकिय निवासावरून सत्ताधारी मंत्र्यांची रस्सीखेच सुरूच आहे. मंत्र्यांच्या या चढाओढीत भरडला जातोय तो म्हणजे शेतकरी, निवडणूकीनंतर सत्तेसाठी राजकिय पुढाऱ्यांची चढाओढ सुरू असताना. अवकाळी पावसाची मदत न मिळाल्याने नोव्हेंबर महिन्यात कर्जबाजारी झालेल्या तब्बल ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे. गेल्या ४ वर्षात एका महिन्यात झालेल्या शेतकरी आत्महत्यांमधील ही सर्वाधिक संख्या  असल्याचे बोलले जाते. त्यामुळे शेतकऱ्याला कुणी वालीच नसल्याचे पून्हा एकदा स्पष्ट झाले आहे.


महसूल विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार ऑक्टोबरमध्ये राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने आत्महत्येच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या पावसात शेतकर्‍यांचे ७० टक्के खरीप पीक नष्ट झाले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान आत्महत्येच्या घटनांमध्ये ६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये दुष्काळग्रस्त मराठवाडा प्रदेशात सर्वाधिक १२० आत्महत्या आणि विदर्भात ११२ आत्महत्या झाल्या आहेत. २०१९ मध्ये महाराष्ट्रात एकूण २५३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे, तर २०१८ मध्ये ही संख्या २५१८ इतकी होती. असा अंदाज आहे की, राज्यातील जवळजवळ एक कोटी शेतकर्‍यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. ही संख्या स्वीडनच्या एकूण लोकसंख्येइतकी आहे आणि राज्यातील एकूण शेतकर्‍यांच्या संख्येपैकी दोन तृतीयांश आहे. यापैकी सुमारे ४४ लाख शेतकरी मराठवाडा भागातील आहेत. आता राज्य सरकार या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत आहे.

हेही वाचाः- मुंबईतील 'हे' परिसर सर्वाधिक प्रदूषित

याबाबत अधिका-यांनी सांगितले की आतापर्यंत ६५५२ कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी वितरित केले गेले आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची कर्जे माफ करणार असल्याचे जाहीर केले होते. यापूर्वी सन २०१७ मध्ये महाराष्ट्रातील भाजपा सरकारने ४४ लाख शेतकर्‍यांचे १८ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा