Advertisement

Maharashtra assembly election 2019- बोरीवलीतून भाजपचे सुनील राणे संधीचं सोनं करणार का?

1980 पासून आज तागायत म्हणजेच 9 वेळा बोरिवली विधानसभा भाजप जिंकत आली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणूकीत सर्वच प्रमुख पक्ष वेगवेगळे लढले.

Maharashtra assembly election 2019- बोरीवलीतून भाजपचे सुनील राणे संधीचं सोनं करणार का?
SHARES

मुंबईच्या बोरिवली विधानसभेत यावेळी मोठे बदल झाले आहेत. या विधानसभा क्षेञातून 2014 मध्ये निवडून आलेले भाजपचे मंञी विनोद तावडे यांचे तिकिट कापून भाजपने सुनिल राणे यांना संधी दिली आहे. बोरिवली हा भाजपचा गड म्हणून ओळखला जातो.

बोरीवलीच्या जागेवर सर्वांची नजर 

बोरीवली विधानसभा परिक्षेञात भाजपचे कायमच वर्चस्व राहिलेले आहे. या भागातील खासदार गोपाळ शेट्टी यांनी याच मतदार संघाचे दोन वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. 1980 पासून आज तागायत म्हणजेच 9 वेळा बोरिवली विधानसभा भाजप जिंकत आली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणूकीत सर्वच प्रमुख पक्ष वेगवेगळे लढले. त्यावेळी या विधानसभेतून भाजपच्या विनोद तावडे यांनी शिवसेनेच्या उत्तमप्रकाश अग्रवाल यांचा पराभव केला होता. विनोद तावडेंनी अग्रवाल यांचा 79267 (44.80%) मतांनी पराभव केला होता. या निवडणूकीत तावडेंना 108278 तर अग्रवाल यांना  29011 मत मिळाली होती.

80 च्या दशकापासून भाजपचे वर्चस्व

1978 मध्ये भारतीय जनता पार्टी कडून माजी खासदार राम नाईक हे या जागेवर पहिल्यांदा निवडून आले होते. 1985 सालांपर्यत नाईक यांनी या बोरिवली विधानसभेतून भाजपचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर 1990, 1995 व 1999 च्या विधानसभा निवडणूकीतून भाजपकडून हमेंद्र मेहता हे या बोरिवली विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2004 व 2009 मध्ये भाजपने  या विधानसभेची धुरा ही सध्याचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्याकडे सोपवली. आपल्या कामाच्या आणि दांडग्या जनसंपर्काच्या जोरावर लोकसभेला गोपाळ शेट्टी सर्वाधिक मत मिळवत याच लोकसभा मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आले 

शिवसेनेच्या अग्रवाल यांचा पराभव

2014 च्या विधानसभा निवडणूकीत भाजपच्या विनोद तावडे यांना 1,08,278 मत मिळाली. तर कांग्रेसचे उमेदवार अशोक सुत्राले यांना  14,993 मत मिळाली. तर शिवसेनेच्या अग्रवाल यांना 29011 मत मिळाली. तर एमएनएसच्या नयन कदम यांना 21765 मत आणि एनसीपीच्या इंद्रपाल सिंह यांना 1190 मत मिळाला होती. तर 2056 जणांना नोटाचा पर्याय स्विकारला होता.

एकूण मतदार - 178977
पुरुष मतदार - 96402
महिला मतदार - 82359

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा