Advertisement

Maharashtra assembly election 2019 - कुलाब्यातून राहुल नार्वेकर विश्वासास पात्र ठरणार का?

5 वेळा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेलेले राज पुरोहित हे भाजपचे कट्टर अनुयायी मानले जातात. मुंबई महानगर पालिकेमध्ये देखील त्यांनी 1985 साली नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे.

Maharashtra assembly election 2019 - कुलाब्यातून राहुल नार्वेकर विश्वासास पात्र ठरणार का?
SHARES

काँग्रेसच्या बाले किल्याला सुरूंग...

दक्षिण मुंबईतील लोकसभा मतदारसंघातला कुलाबा हा मतदार संघ तब्बल 1962 सालापासून काँग्रेसचा गड माणला जायचा. माञ 2014 च्या मोदी लाटेत भाजपने या मतदारसंघाला सुरूंग लावत. हा मतदार संघ भाजपकडे ओढला. दक्षिण मुंबईचे शेवटचे टोक म्हणून ओळखला जाणाऱ्या या मतदार संघात उच्चभ्रूवस्तीपासून ते सर्व सामान्यांपर्यतचे नागरिक राहतात. सुरुवातीपासूनच या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे. इथे 1962 सालापासून आत्तापर्यंत झालेल्या 12 विधानसभा निवडणुकांपैकी 9 वेळा इथून काँग्रेसचे उमेदवार विधानसभेवर गेले खरे माञ त्यांना हा गड राखता आला नाही.  भाजपच्या राज पुरोहित यांना इथल्या निष्ठावान काँग्रेस मतदारांनी विजयी केल्याचे बोलले जाते.

राज पुरोहित यांचा पत्ता कट

5 वेळा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेलेले राज पुरोहित हे भाजपचे कट्टर अनुयायी मानले जातात. मुंबई महानगर पालिकेमध्ये देखील त्यांनी 1985 साली नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे.आमदारकीच्या काळात सरकारमध्ये विविध खात्यांचे राज्यमंत्री म्हणून देखील त्यांनी कार्यभार पाहिला आहे. भाजपच्या मुंबईतील अनुभवी आमदारांमध्ये राज पुरोहित यांचं नाव घेतलं जातं. पुण्यातील एका कथित जमीन घोटाळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज पुरोहित यांच्यावर आरोप केले होते. त्याशिवाय काही वर्षांपूर्वी राज पुरोहित यांच्या संभाषणाच्या ऑडिओ टेप व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळेच की काय भाजपने यंदा पुरोहित यांचे तिकिट कापत पक्षाने नवोदीत राहुल नार्वेकर यांना तिकिट दिल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या

विधानसभा निवडणूक 2014 निकाल

१) राज पुरोहित, भाजप – 52608
२) पांडुरंग सकपाळ, शिवसेना – 28821
३) अॅनी शेख, काँग्रेस – 20410
४) बशीर पटेल, राष्ट्रवादी – 5966
५) अरविंद गावडे, मनसे – 5452

मतदानाची टक्केवारी – 46.19%

मतदारसंघ क्रमांक –187

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

पुरुष – 1,49,739
महिला – 1,04,190

एकूण मतदार – 2,53,929



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा