माहिम मतदार संघात कोण मारणार बाजी? थोड्याच वेळात निकाल होणार जाहीर

मुंबईतील माहिम विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात मोठी लढत होणार आहे.

माहिम मतदार संघात कोण मारणार बाजी? थोड्याच वेळात निकाल होणार जाहीर
SHARES

विधानसभा निवडणुकीच्या मतदान मोजणीला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात निकाल जाहीर होणार आहेत. राज्यात अनेक विधानसभा मतदारसंघात निकालावेळी चुरशिची लढत पाहायला मिळणार आहे. विषेश म्हणजे मुंबईतील माहिम विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात मोठी लढत होणार आहे. 

माहिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून सदा सरवणकर आणि मनसेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, या मतदारसंघात शिवसेनेच वर्चस्व आहे. त्यामुळे मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे हे सदा सरवणकर यांचा पराभव करणार का? हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.

यंदा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदारांकडे विरोधी पक्षाची मागणी केली होती. सत्ताधारांना प्रश्न विचारण्यासाठी एक न घबरणारा सक्षम विरोधी पक्ष पाहिजे असं म्हटलं होत.हेही वाचा

Assembly Elections Live : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात, कोण मारणार बाजी?


संबंधित विषय