मतदान केंद्रांवर मोबाईल जामर नाहीच- निवडणूक आयोग

स्टाँगरूम आणि मतमोजणी केंद्रांवर मोबाईल जॅमर बसवण्याची मागणी विरोधकांनी केली होती. त्यावर उत्तर देताना कुठल्याही मतमोजणी केंद्रावर मोबाईल जॅमर बसवणार नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.

SHARE

स्टाँगरूम आणि मतमोजणी केंद्रांवर मोबाईल जॅमर बसवण्याची मागणी विरोधकांनी केली होती. त्यावर उत्तर देताना कुठल्याही मतमोजणी केंद्रावर मोबाईल जॅमर बसवणार नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.

कुणाची मागणी?

‘ईव्हीएम’ (EVM)ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्या, अशी मागणी विरोधी पक्षाने एकत्रीतरित्या निवडणूक आयोगाकडे केली होती. परंतु निवडणूक आयोगाने विरोधकांची ही मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन हॅक होण्याचा धोका असल्याचं म्हणत मतदानाच्या दिवसापासून मतमोजणीपर्यंत राज्यातील सर्व मतदान केंद्रे आणि स्ट्राँगरुमच्या ३ किमी परिसरात इंटरनेट सेवा बंद ठेवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. या मागणीवर स्पष्टीकरण देताना निवडणूक आयोगानं कुठल्याही मतदान केंद्रावर जॅमर बसवण्यात येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. 

निवडणूक आयोगाचं म्हणणं काय?

ईव्हीएम मशीन कुठल्याही बाह्य यंत्रणांद्वारे हाताळता येऊ शकत नाही. या मशीनचा इंटरनेट, वायफायशी कोणत्याही प्रकारे संपर्क होऊ शकत नाही. त्या पूर्णपणे सुरक्षीत असल्याने मतमोजणी केंद्र आणि स्ट्राँगरूममध्ये मोबाईल जॅमर बसवण्याची गरज नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी स्पष्ट केलं.हेही वाचा-

ठाणे: EVM च्या विरोधात 'त्याने' चक्क मशीनवर फेकली शाई!

Maharashtra Assembly Elections 2019: मुंबईसह राज्यभरात मतदानाचा टक्का घसरलासंबंधित विषय
ताज्या बातम्या