Advertisement

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी

निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली असली, तरी निवडणुकीच्या कामाला अधिकृतरित्या सुरूवात झाली नव्हती. परंतु शुक्रवारी निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्याने इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी
SHARES

निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली असली, तरी निवडणुकीच्या कामाला अधिकृतरित्या सुरूवात झाली नव्हती. परंतु शुक्रवारी निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्याने इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  

महाराष्ट्र विधानसभेची मुदत  ९ नोव्हेंबर रोजी संपत आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखेची गेल्या आठवड्यात घोषणा केली. त्यानुसार महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी इच्छुक उमेदवारांना ४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. २१ आॅक्टोबर रोजी मतदान होणार असून २४ आॅक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

महाराष्ट्रात ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. निवडणुकीसाठी राज्यात एकूण ९५,४७३ मतदान केंद्र उभारण्यात येतील. त्यात १.८ लाख ईव्हीएमचा वापर करण्यात येईल.

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे:

  • ४ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जासाठी मुदत
  • ५ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जांची छाननी
  • ७ ऑक्टोबर : अर्ज मागे घेण्याची मुदत
  • २१ ऑक्टोबर : मतदान
  • २४ ऑक्टोबर : मतमोजणी

हेही वाचा-

महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ तारखेला मतमोजणी

विधानसभा निवडणुकीसाठी माधुरी दीक्षितचं मतदारांना आवाहन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा