राज्यभरात २१ ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक होणार असून सर्वच राजकिय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तसंच, या निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी सहभाग घ्यावा यासाठी मतदार जनजागृतीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. विविध कार्यक्रम सध्या राबविले जात असून, याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आता अभिनेत्री माधुरी दिक्षित यांच्यामार्फत 'चला मतदान करूया' ही मोहीम चित्रफितीच्या रूपानं राबवण्यात येत आहे. या मोहिमेच्या अंतर्गत अधिकाधिक मतदारांनी मतदान करावं यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
'चला मतदान करूया' या चित्रफितीद्वारे माधुरी लोकशाही प्रक्रिया, देशाच्या विकासात जागरूक मतदारांच्या भूमिकेचं महत्त्व समजावून सांगत आहेत. मतदारजागृतीच्या मोहिमेला कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांची साथ मिळाली आहे. समाजमाध्यमं, मुद्रित माध्यमं आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच जाहिरात फलक, भित्तीपत्रकाद्वारे हे सदिच्छादूत लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचं आवाहन करत असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
या
विविध मान्यवरांमध्ये पद्मभूषण,
महाराष्ट्रभूषण
सन्मानित अणुशास्त्रज्ञ डॉ.
अनिल
काकोडकर,
ज्येष्ठ
साहित्यिक मधू मंगेश कर्णिक,
अभिनेते
प्रशांत दामले,
अभिनेत्री
मृणाल कुलकर्णी,
डॉ.
निशिगंधा
वाड,
राष्ट्रीय
पुरस्कारप्राप्त अभिनेत्री
उषा जाधव,
महिला
क्रिकेटपटू स्मृती मानधना,
अर्जुन
पुरस्कारप्राप्त महिला धावपटू
ललिता बाबर,
अर्जुन
पुरस्कार सन्मानित जलतरणपटू
वीरधवल खाडे,
कॉमनवेल्थ
गेम्समधील सुवर्णपदकविजेत्या
नेमबाज राही सरनोबत,
तृतीयपंथी
कार्यकर्त्या गौरी सावंत,
दिव्यांग
कार्यकर्ता निलेश सिंगीत
यांचा समावेश आहे.
हेही वाचा -
मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी
सैफ अली खान या चित्रपटात साकारणार नागा साधूची भूमिका, ट्रेलर झाला प्रदर्शित