Advertisement

Maharashtra assembly election- दहिसर विधानसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी?


Maharashtra assembly election-  दहिसर विधानसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
SHARES

राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. शिवसेना-भाजप यांच्या युतीनं आपल्या उमेदवरांची यादी जाहीर केली असून जागावाटपही केली. त्याशिवाय कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस यांच्या आघाडीनं ही आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून जागावाटप केली आहे. शिवसेना-भाजप यांच्या युतीनं मनीषा चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. तसंच, कॉंग्रेसनं अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली आहे.

दहिसरचं गणित

दहिसरमध्ये मराठी, गुजरात आणि उत्तर भारतीय नागरिकांची मोठी संख्या आहे. या विधानसभा मतदारसंघाला २००९ मध्ये बनविण्यात आलं होतं. २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विनोद घोसाळकर यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी शिवसेना आणि भाजपनं एकत्र निवडणुक लढवली होती. परंतु, २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार मनीषा चौधरी यांनी विनोद घोसाळकर यांचा पराभव केला होता. २०१४ मध्ये शिवसेना आणि भाजप यांनी वेगवेगळी विधानसभा निवडणुक लढवली होती.

शिवसेनेचे जास्त नगरसेवक

२०१७ मध्ये महापालिका निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे. या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नगरसेवक आणि भाजपचे २ नगरसेवक आहेत. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेचा उमेदवार निवडणुन येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

कॉंग्रेसचं वर्चस्व कमी

दहिसर विधानसभा मतदारसंघात कांग्रेसचं वर्चस्व नसून कॉंग्रेसच्या शीतल म्हात्रे यांना २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत जवळपास १३ टक्के मत मिळाली होती. मागील वर्षी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत पराभव झाला होता. यंदाच्या निवडणुकीसाठी या मतदारसंघातून कॉंग्रेसनं अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं या मतदारसंघातून कोण विजयी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा