Advertisement

Maharashtra assembly election – मालाड पश्चिम मतदारसंघातून कोण येणार निवडूण?


Maharashtra assembly election – मालाड पश्चिम मतदारसंघातून कोण येणार निवडूण?
SHARES

मुंबई उपनगरमधील मालाड परिसरात मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. राज्यभरात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मालाड मतदारसंघातून कॉंग्रेसनं अस्लम शेख यांनी उमेदवारी मिळाली आहे. उत्तर मुंबईत मालाड पश्चिम येथील जागा कॉग्रेसकडं असून उत्रवरित सर्व जागा शिवसेनेकडं आहेत. त्यामुळं अस्लम शेख देखील शिवसेनत प्रवेश करण्याची शक्यता आहे. मात्र, सध्यस्थितीत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसून, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मालाड पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार निवडणुन आल्यास अस्लम शेख हे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.    

दोनदा आमदार

आमदार अस्लम शेख या मतदारसंघातून २ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सन २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत यांनी विजय मिळवला होता. २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे डॉ. राम बारोट यांचा अस्लम शेख यांनी २००० मतांनी पराभव केला होता. मात्र, त्या विजयाप्रमाणं त्यांना यंदाच्या निवडणुकीत विजय मिळवणं कठीण होत आहे. २०१४ ची विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजपनं वेगवेगळी लढवली होती. त्यामुळं अस्लम शेख यांनी निवडणुकीत विजय मिळाला होता. या मतदारसंघातून अस्लम शेख हे १९९७ ते २००२ पर्यंत समाजवादी पार्टीचे नगरसेवक राहिले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला असून, ते २००२ ते २००७ पर्यंत कॉग्रेसचे नगरसेवक होते. 

सर्वाधिक नगरसेवक

मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे सर्वात जास्त नगरसेवक आहेत. या मतदारसंघातून कॉग्रेसचे ३, शिवसेनेचे २ मनसेचा १ नगर सेवक आहे.  

भाजपच्या उमेदवाराला ठक्कर

सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत अस्लम शेख यांनी भाजपचे उमेदवार आर. यु. सिंह यांचा २७ हजार ६९५ मतांनी पराभव केला होता. तसंच, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या डॉ. राम बारोट यांचा २२०० मतांनी पराभव केला होता. त्याशिवाय शिवसेनेचे उमेदवार डॉ. विनय जैन यांना १७ हजार ८८८ मत मिळाली होती. 

भाजपची नजर

सन २०१४ ची विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजप यांनी वेगवेगळी लढवली होता. त्याचा फायदा अस्लम शेख यांना झाला होता. परंतु, यावेळेस, या जागेवर भाजप कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहे. मागील निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला शिवसेनेच्या उमेदवाराला जास्त मत मिळाली होती. 

गणितात बदल

लोकसभा निवडणुकीत मालाड पश्चिम विधानसभा मतादारसंघात महायुतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांना जवळपास ८८ हजार ८६५ मत मिळाली होती. तर कॉंग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांना ६८ हजार ८३८ मत मिळाली होती. दरम्यान, २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला या मतदारसंघातून ७२ हजार मत मिळाली होती. २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मतांमध्ये १८ हजार मतांनी वाढ झाली आहे. 

त्यामुळं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मालाड पश्चिम मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार रमेश ठाकूर निवडून येणार की, कॉंग्रेसचे उमेदवार अस्लम शेख निवडणून येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement