Advertisement

बुधवारपासून पावसाळी विधीमंडळ अधिवेशनाला सुरुवात

10 ऑगस्ट ते 19 ऑगस्टदरम्यान विधिमंडळाचं अधिवेशन होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

बुधवारपासून पावसाळी विधीमंडळ अधिवेशनाला सुरुवात
SHARES

10 ऑगस्ट ते 19 ऑगस्टदरम्यान विधिमंडळाचं अधिवेशन होणार असल्याची माहिती मिळाली आहे. बुधवारपासून विधीमंडळ अधिवेशनाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

उद्या मोहरमची शासकीय सुट्टी रद्द करून विधिमंडळाचं कामकाज सुरू राहणार असल्याचंही समोर येत आहे. मंगळवारी 11 वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तीन वाजता विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे, असं सांगितलं जात आहे.

विधिमंडळात सचिवांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक झाल्याचं बोललं जात आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी नुकतीच दिल्लीवारी केली आहे. आज दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, उद्या मंगळवारी सकाळी विस्तार होण्याची शक्यता आहे. विधानभवनातील हॉलमध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हा संपूर्ण विस्तार असणार नाही. पण पहिल्या टप्प्यातील विस्तार असणार आहे. या पहिल्या टप्प्यात साधारण 12 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

यावेळी एकूण 12 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात भाजपच्या 8 आणि शिंदे गटाच्या 7 आमदारांचा समावेश असणार असल्याचं सांगितलं जात आहे.हेही वाचा

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता

संजय राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा