Advertisement

मंत्र्यांना 'पटराणी' नकोशी!


मंत्र्यांना 'पटराणी' नकोशी!
SHARES

मुंबई - अॅम्बॅसेडर कार कित्येक दशके देशाच्या आणि राज्याच्या सत्तेची पटराणी होती. अनेक सत्ता, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून राज्यमंत्र्यांचे काळ या अॅम्बॅसेडर कारने बघितला होता. मात्र आता हीच दमदार कार मंत्र्यांना नकोशी झाली आहे. 2014 मध्ये अॅम्बॅसेडर कारचे उत्पादन थांबविण्यात आले होते. 

आता तर राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या 225 अॅम्बॅसेडर कारच्या जागी आता दुसऱ्या कार घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी याबाबत सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केला आहे. काही वर्षांपासून मंत्री, राज्याचे पाहुणे अॅम्बॅसेडर कारचा वापर करण्यास विरोध करत होते. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाकडे या 225 अॅम्बॅसेडर कार बदलण्याशिवाय काहीच पर्याय शिल्लक नव्हता.

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख यांच्यापर्यंत अॅम्बॅसेडर कार वापरल्या जात होत्या. मात्र अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी अॅम्बॅसेडर कारच्या ऐवजी एसयूव्ही कार वापरायला सुरुवात केली. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आणि आता देवेंद्र फडणवीस यांनीही अॅम्बॅसेडर कार वापरणे टाळले.

अनेक सत्ता, हेवेदावे, द्वेष, मत्सर, शह-काटशह आणि कुरघोडय़ांचे राजकारण याची साक्षीदार असलेली अॅम्बॅसेडर कार अगोदरच हद्दपार झाली. मात्र आता ती कायमची काळाच्या पडद्याआड जाणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा