Advertisement

Maharashtra Budget 2020: अर्थसंकल्पातून मुंबईला काय मिळालं? जाणून घ्या

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातून अर्थमंत्र्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून मुंबईसाठी तरतूदी केल्या आहेत. या तरतूदींवर एक नजर टाकूया.

Maharashtra Budget 2020: अर्थसंकल्पातून मुंबईला काय मिळालं? जाणून घ्या
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray)  यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा (maha vikas aghadi government) पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2020 Live updates) राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (finance minister ajit pawar) यांनी शुक्रवारी सादर केला. या अर्थसंकल्पातून अर्थमंत्र्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून मुंबईसाठी तरतूदी केल्या आहेत. या तरतूदींवर एक नजर टाकूया. 

  • राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी (women safty) अर्थसंकल्पात २१०० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस ठाणे (police station) स्थापन करण्यात येणार आहे. मुंबईतही असं पोलीस ठाणे उभारण्यात येणार असून या पोलीस ठाण्यात सर्व महिला पोलीस कर्मचारी- अधिकारी असतील. 
  • राज्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी (mumbai metro project) १ हजार ६५७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईत मेट्रोचे १२ मार्ग प्रस्तावित असून विविध मार्गांवरील कामे प्रगतीपथावर आहेत.   
  • मराठी भाषेच्या प्रचार, प्रसार आणि संवर्धनासाठी मुंबईत मराठी भाषा भवन (marathi bhasha bhavan) बांधण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. फोर्टमधील रंगभवनच्या जागेवर मराठी भाषा भवन बांधण्यात यावं, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी भाषाप्रेमी आणि साहित्यिक करत आहेत. या मागणीला लवकरच मूर्त रुप मिळू शकतं.
  • राज्यभरातून मुंबई इथे येणाऱ्या नागरिकांसाठी नवी मुंबई येथे 'महाराष्ट्र भवन' (maharashtra bhavan) उभारणार
  • अर्थमंत्री अजित पवार यांनी पुढील २ वर्षांसाठी मुद्रांक शुल्कावर (stamp duty) १ टक्का सवलत जाहीर केली आहे. ही सवलत मुंबई महानगर प्रदेश (MMR) , पिंपरी चिंचवड आणि नागपूर या विभागातील ग्राहकांसाठी असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. 
  • मुंबईतील विविध पर्यटन (tourism in mumbai) कामासाठी सन २०२०-२१ करीता १०० कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आला आहे.
 
  • वरळी दुग्धालयाच्या जागेवर आंतरराष्ट्रीय स्तराचं पर्यटन संकुल राज्य सरकार उभारणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मत्स्यालयाचा समावेश असेल.
  • मणीभवनाच्या विकासासाठी २५ कोटी रुपये, तर हाजी अली दर्ग्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद, हाजी अली परिसराच्या विकासासाठी आराखडा तयार करणार 
  • ठाण्यातील मुंब्रा कळवा इथं हज हाऊस प्रस्तावित
  • मुंबई-बंगळुरू काॅरिडाॅरसाठी ४ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव
  • वसई-ठाणे-कल्याण जलमार्गावर (water transport vasai to kalyan) मीरा भाईंदर ते डोंबिवली प्रवासी वाहतूक सुरु करण्यास तत्वतः मान्यता. वाढती लोकसंख्या पाहता मुंबईची लाइफलाइन म्हणजेच रेल्वेवर प्रवाशांचा प्रचंड ताण पडत आहे. हा ताण कमी करण्यासाठी जलवाहतुकीचा पर्याय निवडण्यात आला आहे. जेणेकरून रेल्वे आणि इतर सार्वजनिक वाहतुकीवरचा ताण कमी होईल.
  • वडाळ्यात वस्तू आणि सेवा केंद्र (gst center) उभारणार, वस्तू आणि सेवा केंद्रासाठी १४८ कोटी रुपये देण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा