Advertisement

Maharashtra Cabinet Expansion: अजित पवारांना अर्थखाते, पाहा कुणाकडे कोणती खाती?

जवळपास आठवडाभराच्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर आज राज्याच्या नवीन मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

Maharashtra Cabinet Expansion: अजित पवारांना अर्थखाते, पाहा कुणाकडे कोणती खाती?
SHARES

राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे.

राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. 

मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 29 मंत्र्यांकडे कोण कोणती खाती आहेत.. याबाबत एका क्लिकवर जाणून घेऊयात.

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यंमत्री

गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, उर्जा, राजशिष्ट्रचार

अजित पवार, उपमुख्यमंत्री - वित्त व नियोजन

छगन भुजबळ - अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

दिलीप वळसे पाटील - सहकार

राधाकृष्ण विखे पाटील - महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास

सुधीर मुनगंटीवार - वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय

हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य

चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये

विजयकुमार गावित - आदिवासी विकास

गिरीश महाजन - ग्रामविकास आणि पंचायत राज, पर्यटन

गुलाबराव पाटील - पाणी पुरवठा व स्वच्छता

दादा भुसे - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

संजय राठोड - मृद व जलसंधारण

धनंजय मुंडे - कृषी

सुरेश खाडे - कामगार

संदीपान भुमरे - रोजगार हमी योजना, फुलोत्पादन

उदय सामंत - उद्योग

तानाजी सावंत - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

रविंद्र चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)

अब्दुल सत्तार - अल्पसंख्याक विकास आणि औकाफ, पणन

दीपक केसरकर - शालेय शिक्षण, मराठी भाषा

धर्मरावबाबा आत्रम - अन्न व औषध प्रशासन

अतुल सावे - गृहनिर्माण, इतर मागास आणि बहुजन कल्याण

शंभुराज देसाई - राज्य उत्पादन शुल्क

आदिती तटकरे - महिला आणि बालविकास 

संजय बनसोडे - क्रीडा व युवक कल्याण, बंदरे

मंगलप्रभात लोढा - कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता

अनिल पाटील - मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा