Advertisement

Maharashtra Cabinet Expansion Live: अखेर आज शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

अखेर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहुर्त गवसला.

Maharashtra Cabinet Expansion Live: अखेर आज शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार
SHARES

अखेर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला (Cabinet Expansion) मुहुर्त गवसला. आज शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनी शपथ घेतली. पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात १८ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.

शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.

तर भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांनी संधी देण्यात आली आहे.



  • राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वात प्रथम शपथ घेतली. भाजपाकडून सर्वात प्रथम राधाकृष्ण विखे पाटील यांनी फोन करुन मंत्रिमंडळात स्थान दिल्याचं सांगण्यात आलं होतं. यानिमित्ताने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अनुभवी नेत्याचा समावेश झाला आहे.
  • गिरीश महाजन यांनी शपथ घेतली आहे. ते सलग सहा वेळा आमदार राहिले आहेत. शिवसेना-भाजपा युती सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणून काम केलं आहे. त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात बंदूक दाखवल्याने वाद निर्माण झाला होता.
  • विजयकुमार गावीत यांनी शपथ घेतली आहे. शपथ घेतल्यानंतर राज्यपालांनी मराठीत त्यांचं अभिनंदन केलं.
  • भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शपथ घेतली आहे. त्यांनी सहकार, पणन, महसूल, कृषी अशी अनेक खाती सांभाळली आहे.
  • सुधीर मुनगंटीवार यांनी शपथ घेतली आहे. अर्थमंत्री, वनमंत्री अशी खाती याआधी त्यांनी सांभाळली आहेत.
  • भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शपथ घेतली आहे. त्यांनी सहकार, पणन, महसूल, कृषी अशी अनेक खाती सांभाळली आहे.
  • जळगाव मतदारंघातील आमदार गुलाबराव पाटील यांना संधी देण्यात आली आहे. मागील सरकारमध्ये त्यांच्याकडे सहकार राज्यमंत्री आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रीपदाची जबाबदारी होती. एकनाथ शिंदेंना सर्वात प्रथम पाठिंबा देणाऱ्यांमध्ये गुलाबराव पाटील होते.
  • दादा भुसे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. २००४ पासून सलग आमदार असणाऱ्या दादा भुसे यांना कृषी खात्याचा अनुभव आहे.
  • संजय राठोड यांना संधी देण्यात आली असून शपथ घेतली आहे. तरुणीच्या मृत्यूनंतर वादात अडकल्याने त्यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपाने त्यांच्याविरोधात मोठं आंदोलन केलं होतं. संजय राठोड यांचा समावेश केल्याने भाजपामधील काही नेते नाराज असल्याची चर्चा आहे.
  • पश्चिम महाराष्ट्रातील भाजपा नेते सुरेश खाडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सामाजिक न्यायमंत्री म्हणून त्यांना मंत्रीपदाचा अनुभव आहे. २००४ पासून सलग चारवेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत.
  • सलग पाचवेळा आमदार राहिलेल्या संदीपान भुमरे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. रोजगार हमी व फलसंवर्धन मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे.
  • उदय सामंत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. गेल्या सरकारमध्ये त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून काम पाहिलं आहे.
  • तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. फडणवीस सरकारमध्ये ते जलसंधारण मंत्री होते. २०१९ मध्ये मंत्रीपदाची संधी हुकल्यानं ते नाराज होते.
  • रवींद्र चव्हाण यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. २००९ पासून ते आमदार आहेत.
  • अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. टीईटी घोटाळ्यामुळे अब्दुल सत्तार गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहेत.
  • काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असा राजकीय प्रवास करणारे दीपक केसरकर यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. 
  • २०१४ पासून आमदार असणारे अतुल सावे यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. 
  • शिंदे गटातील आमदार शंभूराज देसाई यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 
  • मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. 



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा