Advertisement

१ ऑगस्टनंतरच महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार होणार

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या याचिकांवर १ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

१ ऑगस्टनंतरच महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार होणार
SHARES

अनेक दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर अखेर राज्यात एकनाथ शिंदे-भाजपची नवी सत्ता स्थापन झाली. एकनाथ शिंदे गट आणि भाजपने सरकार स्थापन केले. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काही दिवसांत 500 हून अधिक शासन निर्णय मंजूर झाले.

मात्र, या दोघांचा शपथविधी होऊन जवळपास महिना उलटला तरी महाराष्ट्रात अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. अशा स्थितीत असे का होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार किमान 1 ऑगस्टपर्यंत होणार नसल्याची माहिती सध्या समोर येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जून रोजी शपथ घेतली. मात्र महिना उलटला तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संपूर्ण राज्य चालवत आहेत.

शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने दिल्लीतील भाजपच्या प्रमुख नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला अद्याप परवानगी दिलेली नाही. याकडे भाजपचे नेते डोळे लावून बसले आहेत.

न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला हवा, असे भाजपचे मत आहे. याशिवाय मंत्रिमंडळ विस्तार करताना नव्या चेहऱ्यांमुळे भाजपचे जुने निष्ठावंत चेहरे बाजूला होणार नाहीत, याचीही काळजी भाजपला घ्यावी लागणार आहे. दरम्यान, लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे शिंदे-फडणवीस सांगतात.



हेही वाचा

विधानपरिषदेच्या जागेसाठी लॉबिंग सुरू, रामदास कदमांच्या नावाची चर्चा

संजय राऊतांना सत्तांतराची स्वप्न रंगवू द्या, एकनाथ शिंदेंचा टोला

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा