Advertisement

'योग्यवेळी भाजपामध्ये बदल होतील'


'योग्यवेळी भाजपामध्ये बदल होतील'
SHARES

शिवसेनेच्या मंत्रिमंडळ बदलावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी शिवसेनेचा अंतर्गत निर्णय असल्याचे सांगत, भाजपामध्ये योग्यवेळी असे बदल होऊ शकतात असे संकेत दिले. तसेच 2019 पर्यंत युतीचे सरकार चालणार आहे. त्यामुळे मध्यवर्ती निवडणूक होऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी त्यांनी विरोधीपक्षांच्या नेत्यांनी निलंबन मागे घेतल्यास सहभागी होऊ असे आश्वासन दिले होते. मात्र निलंबन मागे घेतल्यानंतरही ते सहभागी झाले नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षावर जोरदार टीका केली. त्याचबरोबर विरोधकांनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याचे सांगत अधिवेशनात विरोधकांनी चर्चेपासून पळ काढल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. निवडणूक पराभवाने खचलेला पक्ष आम्हाला सामोरं जाऊ शकला नसल्याचे सांगत त्यांनी विरोधकांच्या वर्मावर घाव घातला. या अर्थसंकल्पात 31 विधेयकं मांडली, त्यातली 22 मंजूर झाली. 8 परिषदेत प्रलंबित आहे तर 1 मागे घेतल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री

  • वेळेवर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील दिलासा, सर्व धोरणाचा योग्य विचार

  • कृषी विकास दर प्रचंड वाढलाय, चाळीस हजार कोटी रुपये जास्त शेतीत शेतकऱ्यांना मिळाले

  • हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, शेतकऱ्यांना आठ हजार कोटी रुपयांची थेट मदत दिली आहे

  • कर्जमाफी हा एक उपाय, पण कर्जबाजारीपणातून सुटका करणारा नाही

  • शेतकरी कर्जमुक्त व्हावा, ही आमची भूमिका

  • निधी वाटप नीट झालं पाहिजे, हे आम्हाला पण मान्य

  • दोन्ही पक्षांच्या बलाबलनुसार तरतूद मिळणार

  • यंदा बजेटमध्ये सर्वच आमदारांना भरीव निधी

  • कर्नाटकमध्ये काँग्रेस, ते पण केंद्राकडे गेलेत कर्जमाफी साठी, त्यांनी स्वतः दिली नाही

  • प्रामाणिक पत्रकार काम करत असताना त्यांना त्रास सहन करावा लागतो, दबाव येतो, पत्रकारितेत अडथळा आणला जातो

  • पत्रकारांना पूर्ण संरक्षण मिळावं, हीच आमची भूमिका

  • या कायद्याचा दुरुपयोग होऊ नये, ही अपेक्षा. 

  • दक्षता समिती स्थापन करण्याची सूचना चांगली, त्याचा विचार करू

  • पंधरा वर्षे सरकार असताना ज्यांनी घोटाळे केले, शेतकरी सक्षम केला नाही, त्यांच्यावरच गुन्हे दाखल होतील, आमच्यावर कसे होतील

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा