रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे राज्य सरकार शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सांगितले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान
मुंबईत सामाजिक न्यायासाठी आयोजित मेळाव्यात शिंदे म्हणाले की, त्यांचे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा करते, ज्यांनी सर्वांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित करणारे साम्राज्य निर्माण केले, तर शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक समुदायांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य पुढे नेले.
माणगाव इथे एकाच ठिकाणी शाहू महाराज आणि डॉ.आंबेडकर यांचे स्मारक उभारणार आहोत. डॉ.आंबेडकरांनी आपल्याला जगातील सर्वोत्तम संविधान दिले.
सरकारनं या दोन वर्षात अनेक विकासाभिमुख कामे केली असून, हे सरकार शेतकरी, कष्टकरी, मजूर, महिला, विद्यार्थी या सर्वांचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं रयतेचं राज्य आणण्याचं काम केलं. त्यांचा आदर्श ठेवून छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे काम पुढे अविरत सुरू ठेवलं.
आता हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार काम करत आहे. समता, बंधुता, न्याय या तत्वाद्वारे मागासवर्गीय घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन
विवेक विचार मंचातर्फे चौथ्या राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद 2024 चे आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवना, बार्टीचे महासंचालक डॉ.सुनील वारे, विवेक विचार मंचाचे अध्यक्ष प्रदीप रावत आणि राज्यातील 160 संघटनांचे प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
शाहू महाराज-बाबासाहेबांचे संयुक्त स्मारक उभारणार
सर्वांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगाराची उपलब्धता आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी गतीनं प्रयत्न केलं जात आहेत. तसेच गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी 5 हजार मुलांना प्रशिक्षण दिलं जात आहे. त्यांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या माध्यमातून नुकताच जर्मनीमध्ये चार लाख रोजगार उपलब्ध होण्यासाठीचा शासन स्तरावर करार करण्यात आला. तसेच राज्यातील कोणताही युवक बेरोजगार राहणार नाही, यासाठी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना, कौशल्य विकास योजना तसेच स्टार्टअपसारख्या योजना राज्यात प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत. याचा फायदा कित्येक तरुणांना होत आहे.
हेही वाचा