Advertisement

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला जाण्याची शक्यता

नागपूर विमानतळावर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला जाण्याची शक्यता
SHARES

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मंगळवारी सांगितले की, मी अयोध्येला प्रभू रामाची पूजा करण्यासाठी जाणार आहे, मात्र कधी ते स्पष्ट केले नाही. उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरात भगवान रामाचे भव्य मंदिर बांधले जात आहे.

नागपूर विमानतळावर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे म्हणाले की, सोमवारी अयोध्येतील काही धर्मगुरूंनी त्यांची भेट घेतली आणि प्रभू रामाच्या दर्शनासाठी अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले.

शिंदे म्हणाले, "अयोध्या हे आमचे श्रद्धास्थान आहे आणि मी तिथे नक्कीच जाईन." ऑगस्ट 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराची पायाभरणी केली होती. नोव्हेंबर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला.

दरम्यान, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 192 वी जयंती (Savitribai Phule Jayanti) आहे. जयंती निमित्त सावित्रीबाईंच्या जन्मगावी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. यावेळी बोलताना त्यांनी ओबीसी समाजाला आश्वस्त केलंय. पुण्यातील भिडेवाड्याबद्दल अनेक बैठका घेतल्या. सगळया अडचणी दूर करुन भव्य स्मारक उभ करणार. दोन महिन्यांत त्याचं भूमिपूजन करायचं आहे, असा शब्द देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. यांनी दिला आहे.



हेही वाचा

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची SIT चौकशी, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा