Advertisement

‘तेव्हाच’ आरे कारशेडचा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

आरेतील मेट्रो ३ चं कारशेड नेमकं कुठं हलवणार याबंधीच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना भाष्य केलं.

‘तेव्हाच’ आरे कारशेडचा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट
SHARES

आरेतील ६०० एकर जमीन वनांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय नुकताच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यानंतर आरेतील मेट्रो ३ चं कारशेड नेमकं कुठं हलवणार याबंधीच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना भाष्य केलं. विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाची सांगता मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने झाली. (maharashtra cm uddhav thackeray clarifies on metro 3 aarey car shed in vidhan sabha)

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ आरेची ६०० एकर जागा वनांसाठी राखीव ठेऊन तिथं वनसंपदेचं संवर्धन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवार २ सप्टेंबर रोजी घेण्यात आला. परंतु सरकारने आरेत ६०० एकर जागा संरक्षित जंगल म्हणून घोषित करतानाच प्रस्तावित मेट्रो कारशेडची जागा वेगळी केली आहे. ही शिवसेनेकडून होणारी फसवणूक असून त्याच जागेवर कारशेडचं काम सुरू ठेवण्यासाठी रचलेलं एक षडयंत्र आहे, असा आरोप काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी केला. 

तर मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा कुठली आहे, याचा तपशील सादर करा, अशी मागणी देखील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती.

हेही वाचा- आरेतील ६०० एकर जागा वनांसाठी राखीव, मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

त्यावर राज्य सरकारची भूमिका मांडताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आरे कारशेडसंबंधी आम्ही तज्ज्ञांशी चर्चा करुनच निर्णय घेत आहोत. या मेट्रोसाठी जो खर्च करण्यात आला आहे. तो खर्च वाया न जाता मेट्रोचा अधिकाधिक मुंबईकरांना कसा फायदा मिळेल, याच दृष्टिने सरकार पावलं टाकत आहे. 

मुंबईत जन्मलेली पहिली व्यक्ती महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभली हे मी माझं भाग्य समजतो. मुंबईकरांसाठी आपण अनेक गोष्टी आणणार असून जनसंपत्तीसह वनसंपत्तीही महत्त्वाची आहे. परंतु विकासाचं काम करत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये. कुठलंही काम करताना अहंकार असता कामा नये. कामं सोपी करण्यासाठी कुणी शॉर्टकट देखील मारु नये. नाहीतर रात्रीच्या अंधारात झाडे कापावी लागतात. रात्री चालणारी कामं आम्ही दिवसा करु लागलो आहोत. आम्ही जे काही करतो ते दिवसाढळ्या करतो, असा अप्रत्यक्ष टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा