Advertisement

केवळ जय जवान, जय किसान नाही, तर जय कामगार ही आवश्यक- उद्धव ठाकरे

कामगार हा देशाचं अर्थचक्र चालवतो. त्यामुळे गुंतवणुकीच्या जोडीने रोजगार किती निर्माण होतो आणि या कामगार वर्गाचं संरक्षण यालाही तितकंच महत्त्व आहे.

केवळ जय जवान, जय किसान नाही, तर जय कामगार ही आवश्यक- उद्धव ठाकरे
SHARES

कामगार हा देशाचं अर्थचक्र चालवतो. त्यामुळे गुंतवणुकीच्या जोडीने रोजगार किती निर्माण होतो आणि या कामगार वर्गाचं संरक्षण यालाही तितकंच महत्त्व आहे, म्हणूनच जय जवान, जय किसान यासोबतच जय कामगार अशी घोषणाही महत्त्वाची आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या नीती आयोगाच्या सहाव्या बैठकीत बोलत होते. 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान, जय किसान अशी घोषणा दिली. पण माझे वडील बाळासाहेब नेहमी म्हणायचे की  या जोडीने जय कामगार ही घोषणा पण महत्त्वाची आहे. कारण जसं शेतकरी पीक पिकवतो व खाऊ घालतो, जवान हे देशाच्या सीमेचं संरक्षण करतात तसंच कामगार हा अर्थचक्र चालवतो. त्यांना पुरेसं संरक्षण मिळालंच पाहिजे. उद्योगांतून केवळ किती भांडवल येतं हे महत्त्वाचं नाही, तर रोजगार निर्मिती किती झाली त्याला महत्त्व आहे. केंद्र सरकारने यादृष्टीने कामगारांना संरक्षण मिळेल हे पाहिलं पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

हेही वाचा- “कल करे सो आज कर”, कार्यालयीन वेळेबाबत पंतप्रधानांकडे उद्धव ठाकरेंची ‘ही’ मागणी

कार्यालयीन वेळेच्या बाबतीतही पारंपरिक १० ते ५ ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणं गरजेचं आहे. त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावं, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.

गेल्या वर्षभरात आपण माहिती तंत्रज्ञानावर भरपूर भर दिला असून इंटरनेट सुविधा सर्व गावांमध्ये पोहोचवणं आमचं उद्दिष्ट्य आहे. भारतनेटच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा जाळं पसरविणं सुरु असलं तरी अजून दुर्गम भागातील २५०० पेक्षा जास्त गावं व खेड्यांमध्ये इंटरनेट व मोबाईल कनेक्टिव्हीटी पोहोचलेली नाही. केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालून ही सुविधा राज्याला लवकरात लवकर कशी मिळेल ते पाहावं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. गावोगावच्या नागरिकांना माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व सेवांचा जलद, चांगला लाभ मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत असंही ते म्हणाले.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही सुधारणा व्हावी म्हणून राज्य शासन प्रयत्न करीत असून केंद्राने अशा प्रकल्पांना प्राधान्याने साहाय्य करावं, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा