Advertisement

नितीन राऊत यांनी महावितरणमध्ये क्लार्कचं काम करावं- प्रवीण दरेकर

नितीन राऊत यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि क्लार्क म्हणून महावितरणमध्ये नोकरी करावी, असा खोचक सल्ला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

नितीन राऊत यांनी महावितरणमध्ये क्लार्कचं काम करावं- प्रवीण दरेकर
SHARES

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (nitin raut) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि क्लार्क म्हणून महावितरणमध्ये नोकरी करावी, असा खोचक सल्ला भाजप आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उस्मानाबादमध्ये आलेल्या प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं. ते म्हणाले, उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन महावितरणच्या कार्यालयात क्लार्कचं काम करावं म्हणजे आम्ही त्यांच्याकडे बिलं घेऊन तपासणीसाठी येतो. बिलं तपासणं हे काय मंत्र्याचं काम आहे का? नितीन राऊत यांनी याआधी १०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली होती आणि आता वीज बिलात सवलत देऊ असं ते म्हणताहेत. हा प्रकार म्हणजे वीज ग्राहकांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखा आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांमध्ये ताळमेळ नसल्याने राज्यात अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं आहे, असंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा- वीज ग्राहक आमचा देव, पण, वाढीव वीज बिलांवरून ऊर्जामंत्री म्हणाले...

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भाजपा नेत्यांनी वीज बिलं घेऊन माझ्या कार्यालयात यावं, मी सर्व बिलं तपासून पाहि,न जर वाढीव वीज बिलं नसतील तर भाजप नेत्यांनी प्रॉमिस करावं की आम्ही सर्व वीज बिलं भरू असं आव्हान नितीन राऊत यांनी दिलं होतं.

वीज बिल माफीबाबत सरकार गंभीर आहे. वीज ग्राहकांची सेवा हाच आमचा धर्म आहे. वीज ग्राहक हा आमचा देव आहे. आम्ही त्या ग्राहकाचं नुकसान आम्ही करणार नाही. थकबाकीसाठी व्याज आणि दंड माफ करुन थकबाकी भरण्याची सवलत देण्यात येईल. १०० युनिट वीज बिल माफीबाबत गट तयार करण्यात आला आहे, अशी माहितीही नितीन राऊत यांनी दिली.

(maharashtra energy minister nitin raut must give resign demands bjp leader pravin darekar over extra electricity bill issue)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा