Advertisement

तीन दिवसांत वीज बिल सवलतीचा निर्णय न घेतल्यास… भाजप नेत्याचा इशारा

येत्या ३ दिवसांत राज्य सरकारने वीज बिलात सवलत देण्याचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करण्याचा इशारा अतुल भातखळकर यांनी सरकारला दिला आहे.

तीन दिवसांत वीज बिल सवलतीचा निर्णय न घेतल्यास… भाजप नेत्याचा इशारा
SHARES

ग्राहकांना पाठवलेली अवास्तव वीज बिले भरावीच लागतील असा पवित्रा घेणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध  करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी शुक्रवारी महावितरणच्या वांद्रे येथील 'प्रकाश गड' येथील कार्यालयावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन केलं. यावेळी येत्या ३ दिवसांत राज्य सरकारने वीज बिलात सवलत देण्याचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करण्याचा इशारा भातखळकर यांनी दिला.

लॉकडाऊन काळात राज्यातील वीज ग्राहकांना भरमसाठ वीजबिले पाठवण्यात आली. या वाढीव वीज बिलांमध्यं सवलत देण्याचं महाविकास आघाडी सरकारने याआधी जाहीर केलं होतं. पण वाढीव वीज बिलांबाबत दिलासा देता येणार नाही आणि ग्राहकांना ती भरावीच लागतील, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. ही जनतेची मोठी फसवणूक असून महावितरण सक्तीने वीजबिले वसूल करण्याचा प्रयत्न करत आहे. याविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेत वीज बिलांची होळी आणि मोर्चा-आंदोलन काढण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचा- उद्धव, आदित्य ठाकरेंवर भाजपचा पुन्हा गंभीर आरोप

त्यानुसार मुंबईतील महावितरणच्या प्रकाशगड कार्यालयावर काढलेल्या भव्य मोर्चात बोलताना आमदार अतुल भातखळकर म्हणाले, उर्जा खातं काँग्रेस पक्षाकडे असल्यामुळे वाढीव वीज बिलांत सवलत देण्यासाठी आवश्यक असणारा निधी देण्यास मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी नकार दिला आहे. श्रेयवादाच्या लढाईत राज्यातील जनतेला वेठीस धरण्याचं दुष्पाप महाविकास आघाडी सरकार करीत आहे. मात्र जोपर्यंत राज्यातील जनतेला ३०० युनिट पर्यंतची सवलत आणि वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही, तोपर्यंत भाजपचं आंदोलन सुरू राहील, सरकारने याबाबत दिलासादायक निर्णय न घेतल्यास ठाकरे सरकारला आगामी काळात महाराष्ट्रातील जनता ‘शॉक’ दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील अतुल भातखळकर यांनी दिला.

तर, राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला वीज बिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी सोमवार २३ नोव्हेंबर रोजी भाजपतर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात येणार आहे. वीज ग्राहकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केलं आहे.

(bjp mla atul bhatkar done agitation against maha vikas aghadi government on extra electricity bill)

हेही वाचा- "वीज ग्राहकांना वाढीव बिलातून दिलासा नाहीच"

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा