Advertisement

उद्धव, आदित्य ठाकरेंवर भाजपचा पुन्हा गंभीर आरोप

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे मोठमोठ्या बिल्डरसोबत पार्टनरशीप असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. यावरून पुन्हा एकदा वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

उद्धव, आदित्य ठाकरेंवर भाजपचा पुन्हा गंभीर आरोप
SHARES

भाजपचे (bjp leader kirit somaiya) नेते किरीट सोमय्या यांनी मालमत्तेच्या खरेदीवरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहे. तर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे मोठमोठ्या बिल्डरसोबत पार्टनरशीप असल्याचा दावा देखील सोमय्या यांनी केला आहे. यावरून पुन्हा एकदा वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कर्जत इथं जमिनी आहेत. त्या उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलेल्या नाहीत. या जमिनी लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे का? असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे यांचा जमिनी घेण्याचा आणि विकण्याचा व्यवसाय असून हा व्यवसाय लपवण्याचा प्रयत्न ते करत आहेत का? उद्धव ठाकरे यांच्या प्रतिज्ञापत्रात पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाने तीन जमिनी दोन दोन वेळा लिहिल्या आहेत. मग तुम्ही दुसरी कुठली जमीन लपण्याचा प्रयत्न करत आहात का? असे प्रश्न विचारून किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा- कितीही फडफड केली तरी.., संजय राऊतांचा सोमय्यांना इशारा

तर आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांची ठाण्यातील प्रसिद्ध अजय आशर बिल्डरसोबत पार्टनरशीप आहे . मंत्री झाल्यानंतरही दोन कंपनीचे मॅनेजिंग पार्टनर. यासंदर्भातील डाॅक्युमेंट्स मी आपल्यासमोर ठेवत आहे. आदित्य मंत्रिपदाची शपथ घेतात आणि त्यानंतरही स्वत:चा व्यवसाय चालू ठेवतात, हा ऑफिस ऑफ प्रॉफिटचा भंग नाही का? असा प्रश्न उपस्थित करून किरीट सोमय्या यांनी आदित्य ठाकरे यांनाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.

याआधी अन्वय नाईक यांचे कुटुंबीय आणि ठाकरे कुटुंबीय यांच्यात जमिनीचे व्यवहार झाल्याचा दावा करून किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केलं होतं. त्याला शिवसेनेचे (shiv sena) मुख्य प्रवक्ते संजय राऊत, नीलम गोऱ्हे, अॅड. अनिल परब आणि रवींद्र वायकर अशा नेत्यांनी प्रत्युत्तर देत जुनी थडगी उकरून काढायचे थांबवा नाहीतर तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता.

(bjp leader kirit somaiya made office of profit allegations on maharashtra cm uddhav thackeray and aaditya thackeray)

हेही वाचा- उद्धव ठाकरेंचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का?, किरीट सोमय्यांचा प्रश्न

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा