Advertisement

अनुसूचित जातीच्या बांधवांवरील अत्याचार सहन करणार नाही- अनिल देशमुख

राज्यात अनुसूचित जातीच्या बांधवांवर होणारे अन्याय, अत्याचार कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. राज्य सरकार अनुसूचित जातीतील बांधवांच्या पाठीशी असल्याचं अनिल देशमुख म्हणाले.

अनुसूचित जातीच्या बांधवांवरील अत्याचार सहन करणार नाही- अनिल देशमुख
SHARES

राज्यात अनुसूचित जातीच्या बांधवांवर होणारे अन्याय, अत्याचार कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. राज्य सरकार अनुसूचित जातीतील बांधवांच्या (maharashtra government always support minorities says anil deshmukh) पाठीशी असून अशा प्रकारच्या गुन्ह्यातील दोषींविरुद्ध तात्काळ व कडक कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिले आहेत. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सांगवी पोलीस ठाण्यातंर्गत दोन-तीन दिवसांपूर्वी एका मुलाचा मारहाणीत दुर्दैवी मृत्यू झाला. यासंदर्भात गृहमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं.

कडक कारवाईचे निर्देश

महाराष्ट्र राज्य हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा सांगणारं राज्य आहे. आपल्या राज्यात गोरगरीब, अनुसूचित जाती व नवबौद्ध बांधवांवर कुठल्याही परिस्थितीत अन्याय-अत्याचार होता कामा नये. राज्यात काही ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यातील दोषींविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस विभागाला दिले असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा - विशेष श्रमिक ट्रेनद्वारे ११.९० लाख स्थलांतरीत मजुरांची पाठवणी- अनिल देशमुख

नेमकं प्रकरण काय?

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सांगवी पोलीस ठाण्यातंर्गत दोन-तीन दिवसांपूर्वी एका मुलाला मारहाण झाली, त्यात तो मयत झाला. या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी पकडले असून पुढील कारवाई सुरू आहे.तसंच नरखेड तालुक्यातील पिंपळधरा येथील अरविंद बनसोड या तरूणाच्या मृत्यूची चौकशी देखील पारदर्शी व निःपक्षपातीपणे करण्यात येईल. त्यासंबंधातील निर्देशही गृहमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता हा तपास उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याकडे  दिला असल्याचे असल्याचेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.

जातीय रंग नको

दरम्यान, अरविंद बनसोड आणि आणखी काही दलित बांधवांवर अत्याचार झाल्याच्या बातम्या येत आहेत. या घटनांना दलित विरुद्ध मराठा असा रंग देऊ पाहणाऱ्यांचा कुटील डाव उधळून लावला पाहिजे. बहुजन समाजामध्ये फूट पाडून, जाती जातींमध्ये भांडणं लावून, स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजून घ्यायला काही लोकं पुढे सरसावत आहेत. यातून त्यांचं क्षुल्लक राजकारण साध्य होईल, पण समाजाचं मोठं नुकसान होईल. त्यामुळे या घटनेची तात्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. सध्या या घटनेवरून पोलीस प्रशासन आणि मंत्रालयावर टीका केली  जातआहे.

हेही वाचा - पालघर हत्याप्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करणार- अनिल देशमुख


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा