Advertisement

विशेष श्रमिक ट्रेनद्वारे ११.९० लाख स्थलांतरीत मजुरांची पाठवणी- अनिल देशमुख

लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या २१ परराज्यातील जवळपास ११ लाख ९० हजार ९९० परप्रांतीय मजुरांना ८२६ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या मूळ राज्यात परत पाठवण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

विशेष श्रमिक ट्रेनद्वारे ११.९० लाख स्थलांतरीत मजुरांची पाठवणी- अनिल देशमुख
SHARES

लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या २१ परराज्यातील जवळपास ११ लाख ९० हजार ९९० परप्रांतीय मजुरांना ८२६ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या मूळ राज्यात परत पाठवण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या सर्व परप्रांतीय मजुरांना ट्रेनद्वारे पाठविण्याचा तिकीट खर्च महाराष्ट्र शासनाने केला असून यासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, अशी माहितीही देशमुख यांनी दिली.

८२६ विशेष श्रमिक ट्रेन

महाराष्ट्रात २२ मार्च पासून लॉकडाऊन सुरू आहे. लाॅकडाऊनमुळे अनेक राज्यातील कुशल, अकुशल कामगार महाराष्ट्रातील विविध भागांत अडकून पडले होते. त्यांच्या विनंतीनंतर तसंच केंद्र सरकारच्या परवानगीनंतर लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करून ८२६ ट्रेनने ११ लाख ९० हजार ९९० कामगार व मजुरांची पाठवणी त्यांच्या मूळ राज्यात करण्यात आली.

हेही वाचा - पियुषजी घाणेरडं राजकारण थांबवा, श्रमिक ट्रेनच्या गोंधळावरून नवाब मलिकांची टीका

राज्याच्या सर्व भागातून १ मे पासून २ जूनपर्यंत  विविध रेल्वेस्टेशन वरून ८२६ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे या सर्वांना पाठविण्यात आलं. यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश (४५०), राजस्थान(२०), बिहार(१७७), कर्नाटक(६), मध्य प्रदेश(३४),प.बंगाल(४९), जम्मू(५), ओरिसा(१७), छत्तीसगढ(६), आसाम(६) उत्तराखंड(३ ) , झारखंड(३२ ), आंध्र प्रदेश(३), गुजरात (४), हिमाचल प्रदेश (१ ), त्रिपुरा(१ ), तामिळनाडू (५ ), मणिपूर (३ ), केरळ(२), तेलंगणा(१), मिझोराम(१) या २१ राज्यांचा समावेश आहे.

३५ रेल्वे स्टेशन

राज्यातील विविध रेल्वे स्थानकांवरून या कामगारांना त्यांच्या-त्यांच्या राज्यात पाठवण्यात आलं. यात भिवंडी ११, डहाणू १,कल्याण १४, पनवेल ४५, ठाणे ३७, लोकमान्य टिळक टर्मिनस १५५, सी.एस.एम.टी. १३७,वसई रोड ३८, पालघर १२, बोरिवली ७२,बांद्रा टर्मिनस ६५,अमरावती ५,अहमदनगर ९,मिरज १०, सातारा १४,पुणे ७८,कोल्हापूर २५, नाशिक रोड ८,नंदुरबार ५, भुसावळ ३ , साईनगर शिर्डी ५, जालना ३, नागपूर १४,औरंगाबाद १२ , नांदेड ३,कुर्डूवाडी १, दौंड ४, सोलापूर ४, अकोला ४,  वर्धा १,  उरळी१२, पंढरपूर ४, सिंधुदुर्गनगरी ७, रत्नागिरी ६ चिपळूण २ या ३५ स्टेशन वरून उपरोक्त ८२६ श्रमिक विशेष ट्रेन सोडण्यात आल्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा