Advertisement

Coronavirus update: सर्व सरकारी कार्यालय आठवडाभर बंद? कॅबिनेटमध्ये होणार निर्णय

राज्यभरातील सर्व सरकारी कार्यालये (government office) बंद ठेवण्याचाही राज्य सरकारकडून (maharashtra government) विचार करण्यात येत आहे. यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असून त्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

Coronavirus update: सर्व सरकारी कार्यालय आठवडाभर बंद? कॅबिनेटमध्ये होणार निर्णय
SHARES

महाराष्ट्रात कोरोना व्हायरचे रुग्ण (Coronavirus) वाढत चालल्याने गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारकडून ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार राज्यभरातील सर्व सरकारी कार्यालये (government office) बंद ठेवण्याचाही राज्य सरकारकडून (maharashtra government) विचार करण्यात येत आहे. यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असून त्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. 

हेही वाचा- Coronavirus : मुंबईत कोरोना व्हायरसचा पहिला बळी

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या ३८ रुग्णांवर उपचार सुरू असून मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात (kasturba hospital) एका ६७ वर्षांच्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाने घेतलेला हा मुंबईतील (coronavirus death in mumbai) पहिला बळी आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा-काॅलेज (school and colleges close) बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्याचसोबत १०-१२ वी च्या परीक्षा वगळता इतर सर्व परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश देण्याच्या सूचना कुलगुरु आणि संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

मुंबईत जमावबंदीचं कलम १४४ लागू (section 144) करण्यात आलं असून पुण्यातही संचारबंदीचे आदेश काढण्यात आले आहेत. कुणीही गर्दी करू नये असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. गर्दी टाळण्यासाठी मंत्रालयात विविध कामांसाठी येणाऱ्या अभ्यागतांना प्रवेश बंदी करण्यात आली असून दर २० मिनिटांनी मंत्रालयात स्वच्छता केली जात आहे. 

हेही वाचा- Corona Virus: ड्रंक अॅण्ड ड्राइव्हची कारवाई थांबवा

खासगी कंपन्यांनी आपल्या ५० टक्के मनुष्यबळासह कामकाज चालवण्याचे तसंच कर्मचाऱ्यांना वर्क फ्राॅम होमनुसार काम करण्याची मुभा द्यावी असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. परंतु मुंबईतील लोकल ट्रेन, बस इ. ठिकाणची गर्दी कमी होत नसल्याने सरकारी कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी राज्यभरातील सर्व कार्यालय बंद ठेवण्याचाही सरकारचा विचार आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी खासगी कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं असून सरकारी कार्यालय बंद राहिल्यास खासगी कंपन्यांनाही आपली कार्यालये बंद ठेवावी लागणार आहेत. 

यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीनंतरच त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा