Advertisement

IAS officers transfer: मिलिंद म्हैसकर यांच्यासह ५ अधिकाऱ्यांची बदली

राज्य सरकारने सोमवारी ५ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये 'म्हाडा’चे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह अजय गुल्हाने आणि नवल किशोर राम यांचा समावेश आहे.

IAS officers transfer: मिलिंद म्हैसकर यांच्यासह ५ अधिकाऱ्यांची बदली
SHARES

राज्य सरकारने सोमवारी ५ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये 'म्हाडा’चे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह अजय गुल्हाने आणि नवल किशोर राम यांचा समावेश आहे. (maharashtra government transfers 5 senior ias officers)

'म्हाडा’चे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांची महसूल आणि वन विभागात प्रधान सचिव (वन) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती झाल्यामुळे जिल्हाधिकारीपदी पूर्णवेळ अधिकाऱ्याची नेमणूक होईपर्यंत या पदाचा अतिरिक्त कार्यभार पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.  

हेही वाचा - महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येता कामा नये- उद्धव ठाकरे

हाफकिन इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त सुहास दिवसे, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे आदी अधिकाऱ्यांची नावे या पदासाठी आघाडीवर आहेत.

औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मंत्रालय उपसचिव पदावर बदली झाली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव संजय खंदारे यांची महाजेनकोच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नवी मुंबईतील जलस्वराज्य प्रोजेक्टचे प्रकल्प व्यवस्थापक अजय गुल्हाने यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, के.एच. बगाटे शिर्डीतील साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

हेही वाचा - सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास अजूनही मुंबई पोलिसांकडेच- गृहमंत्री

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा