Advertisement

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊच, आधी ‘त्या’ १२ आमदारांची नियुक्ती झाली तर बरं- नवाब मलिक

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला हाणण्यात आला आहे.

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊच, आधी ‘त्या’ १२ आमदारांची नियुक्ती झाली तर बरं- नवाब मलिक
SHARES

विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला हाणण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर भाष्य करताना बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त मतांना निवडून येण्याचा दावा केला आहे.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी सांगितलं की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेलं विधानसभा अध्यक्षपद भरून काढण्यासाठी या पावसाळी अधिवेशनात आमदारांचे कोरोना रिपोर्ट आल्यानंतर सरकारमधील तीनही पक्ष निवडणुकीचा निर्णय घेतील. आमच्याकडे असलेल्या बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त मतांनी अध्यक्ष निवडून येईल.

हेही वाचा- राज्यपालांचं उद्धव ठाकरेंना पुन्हा पत्र, ‘हे’ तीन मुद्दे केले उपस्थित

राज्यपाल विधानसभा उपाध्यक्षांना अध्यक्षपदाची निवडणूक लवकर करा, असं सूचित करत आहेत. मात्र विधानपरिषदेच्या १२ रिक्त जागांचा विषय निकाली काढल्यास हे १२ आमदार महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी कामाला लागतील, असा आमचा आग्रह राहिला आहे, याचीही नवाब मलिक यांनी भगतसिंह कोश्यारी यांना आठवण करून दिली.

दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २३ जून रोजी आपल्या शिष्टमंडळासह राजभवन इथं जाऊन राज्यपालांची भेट घेतली होती. त्यानंतर विधानमंडळाचं अधिवेशन अधिक कालावधीसाठी घेण्याबाबत, विधानसभा अध्यक्षांचं संविधानिक पद तातडीने भरण्याची कार्यवाही करण्याबाबत आणि राज्यातील ओबीसी आरक्षणाचा विषय प्रलंबित असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सद्यस्थितीत न घेण्याबाबत  

उपरोक्त तिन्ही विषय अत्यंत महत्त्वाचे असल्याने याबाबत आपण यथोचित कार्यवाही करावी व मला त्याबाबत अवगत करावं, असं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून म्हटलं आहे.

(maharashtra government will take decision on assembly president election says nawab malik)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा