Advertisement

केंद्राच्या भूमिकेमुळेच ओबीसींचं नुकसान, छगन भुजबळ यांचा आरोप

केंद्राच्या भूमिकेमुळेच ओबीसींचं नुकसान होत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

केंद्राच्या भूमिकेमुळेच ओबीसींचं नुकसान, छगन भुजबळ यांचा आरोप
SHARES

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निकाली निघालेला नसतानाच महाराष्ट्रात काही ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामुळे ओबीसींची मोठी फसवणूक होत असल्याचा आरोप भाजपकडून राज्य सरकारवर होत आहे. त्याला प्रत्युत्तर देताना केंद्राच्या भूमिकेमुळेच ओबीसींचं नुकसान होत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसींसाठी राखीव असलेल्या जागांना फटका बसला होता त्याच जागांवर पुन्हा पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. मात्र यात ओबीसींचं नुकसान होत आहे आणि केंद्राच्या  भूमिकेमुळेच ओबीसींचं नुकसान होत आहे, असं छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी म्हटलं आहे.

म्हणून  निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी आम्ही करत आहोत. सध्याच्या कोरोनाच्या काळात जनगणना करता येणार नाही त्यामुळे केंद्राकडे जी माहिती उपलब्ध आहे त्यांनी ती माहिती राज्याला देणं गरजेचं आहे. 

हेही वाचा- ‘हा’ तर ओबीसींवर घोर अन्याय- पंकजा मुंडे

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असताना राज्य सरकारने अनेक गोष्टींना परवानगी नाकारली. अगदी अधिवेशन देखील आपण २ दिवसांचं ठेवलं आहे. वारीला परवानगी नाकारली आहे. इतर अनेक गोष्टींना आपण परवानगी नाकारली आहे. त्यात निवडणुका कशा घेऊ शकतो याचा विचार देखील आयोगाने करायला हवा, असं छगन भुजबळ म्हणाले.

दरम्यान मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंत्री असलो तरी जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत नाही, तोच पोट निवडणुका जाहीर झाल्यामुळे भाजपला आयती टीकेची संधी मिळाली आहे.

हा एक प्रकारचा ओबीसी समाजाचा विश्वासघात आहे. ओबीसींचं राजकीय आयुष्य संपवण्याचा घाट सरकारच्या वतीने घातला जातोय, हे आम्ही सहन करणार नाही. कुठल्याही परिस्थितीत सरकारने हस्तक्षेप करून या निवडणुका रद्द केल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. या निवडणुका जर रद्द केल्या नाहीत, पुढं ढकलल्या नाहीत तर भाजप याविरोधात उग्र आंदोलन करेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्य सरकारला दिला आहे.

(ncp leader chhagan bhujbal blames on modi government for obc reservation issue)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा