Advertisement

मराठा आरक्षण आणि कोरेगाव-भिमा आंदोलनातील ८६४ गुन्हे मागे

एकूण ५४३ गुन्हे मराठा आंदोलकांविरोधात दाखल झाले असून यामध्ये ४६ गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत. थेट पोलिसांवर हल्ले करण्यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा यात समावेश असल्यानं हे ४६ गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत.

मराठा आरक्षण आणि कोरेगाव-भिमा आंदोलनातील ८६४ गुन्हे मागे
SHARES

मराठा आरक्षण आंदोलनातील आणि कोरेगाव-भिमा प्रकरणातील आंदोलकांविरोधातील ८६४ गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्रीकूण ५४३ गुन्हे मराठा आंदोलकांविरोधात दाखल झाले असून यामध्ये ४६ गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत. थेट पोलिसांवर हल्ले करण्यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा यात समावेश असल्यानं हे ४६ गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली आहे. मराठा आंदोलनातील ४३१ तर कोरेगाव-भिमा प्रकरणातील ४३३ असे एकूण ८६४ गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र, काही गंभीर गुन्हे कोणत्याही परिस्थितीत मागे घेतले जाणार नसल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. 


हिंसक आंदोलन

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलन काढण्यात आलं होतं. मूक मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजानं आरक्षणासह अन्य मागण्या उचलून धरल्या होत्या. मात्र, या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यानं मराठा समाज आक्रमक झाला नि त्यातूनच मूक मोर्चाचं  रूपांतर ठोक मोर्चात झालं. त्यातून राज्यभर हिंसक आंदोलन झालं. 


४६ गुन्हे गंभीर 

 आंदोलनादरम्यान एकूण ५४३ गुन्हे मराठा आंदोलकांविरोधात दाखल झाले असून यामध्ये ४६ गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत. थेट पोलिसांवर हल्ले करण्यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा यात समावेश असल्यानं हे ४६ गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. त्याचवेळी ६६ गुन्ह्यांमध्ये ए फायनल तर ११७ प्रकरणांमध्ये चार्जशीट दाखल झाली आहे. त्यामुळे हे ६६ आणि ११७ गुन्हेही मागे घेतले जाणार नसल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. 


काही गुन्हे वगळले

१ जानेवारीला कोरेगाव-भिमा इथं हिंसाचार झाला नि त्याचे पडसाद मुंबईसह राज्यभर उमटले. राज्यभर झालेल्या आंदोलनादरम्यान ६५५ गुन्हे या प्रकरणी दाखल झाले आहे. यातील गंभीर स्वरूपाचे आणि चार्जशीट दाखल झालेले गुन्हे वगळता ४३३ गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं आहे. विधीमंडळातील पक्षनेते अजित पवार यांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावरील उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.हेही वाचा - 

मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम आक्रमक; न्यायालयात घेणार धाव

मराठा आरक्षणानंतर आता धनगर-मुस्लिम आरक्षणासाठी विरोधक आक्रमक
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा