Advertisement

राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी व्यक्त केली पदावरून निवृत्त होण्याची इच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भगतसिंग कोशियारी यांनी पंतप्रधान मोदींकडे पदावरून निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली.

राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी व्यक्त केली पदावरून निवृत्त होण्याची इच्छा
SHARES

राजकीय जबाबदारीतून पायउतार होण्याची इच्छा महाराष्ट्राचे (Maharashtra) राज्यपाल (Maharashtra Governor) भगतसिंग कोश्यारी (Bhagat Koshiyari)  यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे केली आहे.  यांच्या नुकत्याच मुंबई (Mumbai) दौऱ्यावर व्यक्त केली आहे.

राजभवनाने  (Rajbhavan) जारी केलेल्या निवेदनात, राज्यपाल कोश्यारी यांनी आपले उर्वरित आयुष्य वाचन, लेखन आणि इतर विश्रांतीच्या कार्यात घालवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी सोमवारी राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटले आहे की, “महाराष्ट्रासारख्या महान राज्याचा – संत, समाजसुधारक आणि शूर सेनानींच्या भूमीचा राज्यसेवक किंवा राज्यपाल म्हणून काम करणे हा माझ्यासाठी अत्यंत सन्मान आणि विशेषाधिकार होता.

कोशियारी यांनी नुकत्याच झालेल्या मुंबई भेटीत पंतप्रधान मोदींना (#Prime Minister Narendra Modi) शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भगतसिंग कोशियारी यांनी पंतप्रधान मोदींकडे पदावरून निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली.

“गेल्या 3 वर्षांपेक्षा जास्त काळात महाराष्ट्रातील जनतेकडून मला मिळालेले प्रेम आणि आपुलकी मी कधीही विसरू शकत नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई भेटीदरम्यान, मी त्यांना सर्व राजकीय जबाबदाऱ्या सोडण्याची आणि माझे उर्वरित आयुष्य वाचन, लेखन आणि इतर कार्यात घालवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मला माननीय पंतप्रधानांकडून नेहमीच प्रेम आणि आपुलकी मिळाली आहे आणि या संदर्भात मला तेच मिळेल अशी आशा आहे, असे कोश्यारी यांनी राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.हेही वाचा

एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये हिंमत असेल तर निवडणुका जाहीर करा : उद्धव ठाकरे

शिवशक्ती-भीमशक्ती पुन्हा एकत्र, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांकडून युतीची घोषणा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा