Advertisement

शिवशक्ती-भीमशक्ती पुन्हा एकत्र, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांकडून युतीची घोषणा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली.

शिवशक्ती-भीमशक्ती पुन्हा एकत्र, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांकडून युतीची घोषणा
SHARES

राज्याच्या राजकीय पटलावर शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकदा एकत्र आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज (23 जानेवारी) मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७व्या जयंतीनिमित्त आज या युतीची घोषणा करण्यात आली.

दरम्यान, शिवशक्ती आणि भीमशक्तीचा राजकीय प्रयोग पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातच झाला होता आणि आता शिवसेनेतल्या फुटीनंतर पुन्हा एकदा हाच प्रयोग होताना दिसत आहे.

मात्र एकीकडे वंचित आणि शिवसेनेची हात मिळवणी होत असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मात्र यापासून अद्याप दूर असल्याचं दिसतं आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी युतीचा राज्याच्या राजकारणावर कसा परिणाम होतो हे आगामी काळात समजू शकेल.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, "आज बाळासाहेब ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस आहे आणि आम्ही एकत्र येऊन पुढचे पाऊल टाकण्यासाठी एकत्र आलो आहोत, माझे आजोबा आणि प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा स्नेही होते, दोन्ही पिढ्यांचे वारसदार आणि आयुष्यभराचे सोबती होते".

'कंट्री फर्स्ट' असा विचार करून एकत्र येऊ, देशात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत, पुढची राजकीय वाटचाल वेळेनुसार ठरवू.

“निवडणुकीमध्ये एक बदल्याचं राजकारण सुरु होईल. आम्ही जी चळवळ सुरु केली. त्याला आमच्याच मित्र पक्षांनी गिळंकृत करण्याचा किंवा छोटा करण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना बाजूला करुन चळवळ सुरु ठेवली. भांडवलशाही, लुटारुंची सत्ता सुरु झाली आहे. दाओसला जाऊन उद्योग येतात हे मी कधी पाहिलं नाही, फक्त करार होतात. आज ईडीच्या मार्फत पॉलिटिकल लीडरशिपवर आक्षेप घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नाही. नरेंद्र मोदी यांचा सुद्धा एक दिवस अंत पक्षात होणार आहे, त्यांनी त्यांच्या पक्षातील लीडरशिप संपवली आहे. फक्त फाईली उचलून घेऊन जायचं आमचं काम आहे, असं त्यांच्यातले अनेक मंत्री म्हणतात. प्रादेशिक पक्षांचा लीडरशिप तयार करण्याचा प्रयत्न असेल तर त्याला आमचा पाठिंबा असेल, असं प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी म्हटलं.हेही वाचा

आता येतोय ‘बाळासाहेबांचा राज’

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा