Advertisement

आता येतोय ‘बाळासाहेबांचा राज’

आम्हीच बाळासाहेबांची खरी शिवसेना आहोत, असा एकनाथ शिंदे गटाचा दावा आहे. त्याला प्रत्युत्तर द्यायला येत आहेत राज ठाकरे

आता येतोय ‘बाळासाहेबांचा राज’
SHARES

लवकरच ‘बाळासाहेबांचा राज’ हे नाटक सादर केले जाणार आहे. या माध्यमातून  मनसे दोन अंकी नाटकाच्या माध्यमातून राज ठाकरे हेच स्व. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहेत, हे दाखविण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव आणि मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांच्या विशेष सहकार्याने हे नाटक सादर केले जाणार आहे.

बाळासाहेब आणि राज ठाकरे यांच्यात अनेक समान धागे आहेत. व्यंग चित्रकला, हिंदुत्त्वाची भूमिका, वक्तृत्व, संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांवर प्रेम करणं, संवेदनशील प्रश्नांवर राजकारण बाजूला ठेवून पुढे येणं असे एक ना अनेक गुण राज ठाकरे यांच्यात दिसतात. या गुणांची झलक ‘बाळासाहेबांचा राज’ या नाटकातून दाखविली जाणार आहे, असे मत नाटकाचे लेखक-दिग्दर्खक अनिकेत प्रकाश बंदरकर यांनी व्यक्त केले. 

स्व. बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारी रोजी जयंती आहे. या जयंतीदिनाचे औचित्य साधत मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात, दुपारी ४ वाजता नाटकाचा पहिला प्रयोग सादर होणार आहे.

दोन तासांच्या या नाटकात दोनच पात्र आहेत. एक बाळासाहेब आणि दुसरे राज ठाकरे कलाकार सचिन नवरे हे बाळासाहेबांची आणि प्रफुल आचरेकर हे राज ठाकरेंची भूमिका वठविणार आहेत.

नाटक द्विपात्री असल्यामुळे या दोहोंच्या अभिनयासोबतच स्क्रिन प्रेझेंटेशनद्वारे काही जुन्या आठवणी देखील जागविल्या जाणार आहेत, अशी माहिती दिग्दर्शक अनिकेत बंदरकर यांनी दिली. या नाटकाला मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर आणि आमदार राजू पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा