Advertisement

पूरग्रस्तांना ‘इतकी’ मदत मिळण्याची शक्यता, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

प. महाराष्ट्र, कोकणासोबत मुंबईतील पूरग्रस्तांना देखील मदत देण्यात यावी, यावरही बैठकीत चर्चा झाली

पूरग्रस्तांना ‘इतकी’ मदत मिळण्याची शक्यता, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
SHARES

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील (maharashtra) पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी १० हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं म्हटलं जात आहे. मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत पूरग्रस्त भागांमधील नुकसान भरपाईबाबत चर्चा झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आल्याचं समजत आहे. प. महाराष्ट्र, कोकणासोबत मुंबईतील पूरग्रस्तांना देखील मदत देण्यात यावी, यावरही बैठकीत चर्चा झाली.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे नैसर्गिक आपत्ती आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी निर्देश दिल्याप्रमाणे तातडीची मदत म्हणून एसडीआरएफ (राज्य आपत्ती प्रतिसाद निधी) मधील निकषांप्रमाणे बाधितांना मदत सुरु करण्यात आली असून या संदर्भात राज्य मंत्रिमंडळासमोर मदत व पुनर्वसन विभागाने सादरीकरण करण्यात आलं.

हेही वाचा- वीज नसलेली पूरग्रस्त गावं सौर दिव्यांनी उजळणार

पूरग्रस्त भागातील बहुतांश ठिकाणी अद्याप पाणी ओसरले नसल्याने व बाधितांचे पंचनामे सुरु असल्याने पुढील १५ दिवसांत वाढीव मदतीबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीसमोर आणावा असं यावेळी ठरलं. सध्या बाधित कुटुंबांना त्यांच्या घरातील साहित्य, कपडे, भांडी यांच्या नुकसानीसाठी एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे तत्काळ मदत करणे सुरु आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, अकोला आणि अमरावती अशा जवळपास ८ ते १० जिल्ह्यामंध्ये महापूर आणि दरड कोसळून मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्यासाठी सुमारे १० हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता भासेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर सविस्तर बैठक होऊन मोठ्या पॅकेजची घोषणा होईल, असं म्हटलं जात होतं. 

परंतु अद्याप पंचनामे सुरूच असल्याने नुकसानीचा नेमका आकडा समोर आल्याशिवाय पॅकेजची घोषणा करणं शक्य नसल्याने तातडीच्या मदतीचा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा