Advertisement

कडक निर्बंधावर येत्या २ दिवसांत निर्णय, राजेश टोपेंची माहिती

राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्याची मुख्यमंत्र्यांचीही इच्छा आहे. येत्या २ दिवसांत या निर्बंधांबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कडक निर्बंधावर येत्या २ दिवसांत निर्णय, राजेश टोपेंची माहिती
SHARES

कोरोनाबाधितांच्या (coronavirus) वाढत्या संख्येमुळे सरकार कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत चालल्याने राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्याची मुख्यमंत्र्यांचीही इच्छा आहे. येत्या २ दिवसांत या निर्बंधांबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राजेश टोपे (rajesh tope) यांनी सांगितलं, राज्यात दिवाळी सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी उसळली होती. ही गर्दी अजूनही कमी झालेली नाही. चौपाट्या, पर्यटनस्थळे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. बहुतांश लोकं सोशल डिस्टन्सिंगचं कुठलंही भान बाळगताना दिसत नाहीत. अनेकांच्या तोंडावर मास्क घातलेलं दिसत नाही. याकडे पाहून आता लोकांना कोरोनाबाबत गांभीर्य उरलेलं दिसत नाही. जे त्यांच्यासकट इतरांसाठी धोक्याचं ठरू शकतं. यामुळे महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. उल ट अशा बेजबाबदारपणाचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतील.

हेही वाचा- जनतेची जबाबदारी माझ्यावर, हे उघडा, ते उघडा सांगणाऱ्यांवर नाही- उद्धव ठाकरे

या परिस्थितीकडे पाहता सर्वांसाठी उपनगरी रेल्वेसेवा सुरू करण्याचा राज्य सरकारचा सध्या कोणताही विचार नाही. त्याशिवाय शाळा- महाविद्यालयांमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी आणखी उपाययोजना करणं, पर्यटन व सार्वजनिक ठिकाणी कोणतेही नियम न पाळता विनाकारण फिरणाऱ्यांना प्रतिबंध करणं, सार्वजनिक ठिकाणी अनिर्बंध किंवा मुक्त वावर नियंत्रित करणं, विवाह व अन्य समारंभांसाठी पुन्हा २०० वरून ५० नागरिकांनाच हजर राहण्याची मुभा देणं, मास्क न वापरणाऱ्यांना दिल्लीच्या धर्तीवर अधिक दंड आकारणी करणं, अशा अनेक बाबींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक होणार आहे. 

पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. राज्यात पुन्हा शंभर टक्के लॉकडाऊन लावण्यात येणार नसला, तरी शिथील करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

आपण कोरोना रुग्णांचे आकडे खाली आणले. पण दिवाळी आणि नंतर अधिक काळजी घेणं गरजेचं आहे, तसं होताना दिसत नाही. कोरोनाचं संकट नाहीसे झालेलं नाही. तर पाश्चिमात्य देशात बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन लावलं गेलं आहे. दिल्लीत दुसरी, तिसरी लाट आली आहे. गुजरातमध्ये रात्रीची संचारबंदी लावली आहे. ही नुसती लाट नाही तर त्सुनामी आहे की काय असं वाटतंय, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा