Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

महाराष्ट्राला सर्वात जास्त रेमडेसिवीर मिळूनही केंद्रावर बोट का?- प्रविण दरेकर

केवळ आपलं अपयश झाकण्यासाठीच महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री केंद्र सरकारवर विनाकारण टीका करत असल्याचा आरोप भाजप आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

महाराष्ट्राला सर्वात जास्त रेमडेसिवीर मिळूनही केंद्रावर बोट का?- प्रविण दरेकर
SHARES

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत केंद्र सरकारने महाराष्ट्राला (maharashtra) सर्वाधिक रेमेडसिवीरचा पुरवठा केला आहे. तरीही केवळ आपलं अपयश झाकण्यासाठीच महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री केंद्र सरकारवर विनाकारण टीका करत असल्याचा आरोप भाजप आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर टीका केली. ते म्हणाले, देशातील इतर राज्यांच्या तुलनेत केंद्र सरकार महाराष्ट्रात सर्वाधिक रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करत आहे. या अंतर्गत महाराष्ट्राला २१ ते ३० एप्रिल या कालावधीसाठी सर्वाधिक २ लाख ६९ हजार इंजेक्शन देत आहे. तरीही १० हजार इंजेक्शनची तूट आहे, असं म्हणून ठाकरे सरकार आपला अपयशी कारभार लपवण्यासाठी केंद्रावर टीका करण्याचं तसंच राज्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं काम करत आहे. 

हेही वाचा- तर, महाराष्ट्रात मोठं संकट निर्माण होईल, नवाब मलिक यांची भीती 

खरं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येच एकवाक्यता नाही की राज्यात रेमडेसिवीरचा किती तुटवडा आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात की राज्याला दररोज ३६ हजार रेमडेसिवीरची गरज आहे. जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक दिवसाला ५० हजार रेमडेसिवीर हवे असल्याचं म्हणत आहेत. ते कमी म्हणून की काय संजय राऊत ८० हजार रेमडेसिवीरची दिवसाला गरज असल्याचं सांगत आहेत. तर ज्यांचंकडे हे खातं आहे असे अन्न व औषध प्रशासन मंत्री तर काहीच बोलत नाही. म्हणजे आकड्यांत पण यांच्या एकवाक्यता नाही, अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली.

केंद्राच्या रेमडेसिवीर वाटपाच्या निकषानुसार कोरोनाबाधित (coronavirus) रुग्णांच्या संख्येनुसार रेमडेसिवीरचं वाटप केलं जात नाही. कारण या रुग्णांमध्ये लक्षणं नसलेल्या रुग्णांचं प्रमाण मोठं असतं. तर आॅक्सिजनेट म्हणजेच आॅक्सिजन बेडवर असलेल्या रुग्णांच्या संख्येनुसार निकष लावून रेडसेसिवीरचं वाटप करण्यात येतं. त्यानुसार महाराष्ट्राला सर्वाधिक रेमडेसिवीर देण्यात आलेले आहेत. पण खोटं बोल, पण रेटून बोल असंच राज्य सरकारचं सुरू आहे.

केंद्रावर आरोप करण्याआधी राज्य सरकारने कालपर्यंत स्वत:हून किती रेमडेसिवीर मिळवून ती रुग्णांना दिली की रेमडेसिवीरचा साठा आपले नेते, कार्यकर्त्यांमध्ये वाटला रोहीत पवार यांच्याप्रमाणे याचं उत्तर आधी सरकारने द्यावं, असा प्रश्न प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.

(Maharashtra is the biggest beneficiary of remdesivir injection says bjp leader pravin darekar)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा