Advertisement

तर, महाराष्ट्रात मोठं संकट निर्माण होईल, नवाब मलिक यांची भीती

सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या महाराष्ट्रात मोठं संकट निर्माण होऊ शकतं, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

तर, महाराष्ट्रात मोठं संकट निर्माण होईल, नवाब मलिक यांची भीती
SHARES

केंद्र सरकारच्या वाटपानुसार महाराष्ट्राला दिवसाला २६ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स मिळणार आहेत. या इंजेक्शनचं प्रमाण मागणीच्या तुलनेत कितीतरी कमी आहे. परिणामी सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या महाराष्ट्रात मोठं संकट निर्माण होऊ शकतं, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने नुकतीच राज्यांना होणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शन वाटपासंबंधीची आकडेवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्राला दिवसाला ५० हजार इंजेक्शनची गरज आहे. त्यामुळे एवढ्या इंजेक्शनची मागणी सातत्याने केंद्राकडे करण्यात येत असताना आतापर्यंत राज्याला दर दिवशी ३६ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत आहेत. मात्र नव्या वाटपानुसार, महाराष्ट्राला दिवसाला केवळ २६ हजार इंजेक्शन्स मिळणार आहेत. यामुळे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या रमहाराष्ट्रात मोठं संकट निर्माण होऊ शकतं, अशी भीती नवाब मलिक (nawab malik) यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

केंद्राचं नियंत्रण

याचसंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील प्रसारमाध्यमांना माहिती दिली. केंद्राने सातही प्रमुख कंपन्यांकडून कोणत्या राज्याला किती रेमडेसिवीर वाटायचं याचं नियंत्रण स्वत:कडे घेतलं आहे. यातून महाराष्ट्राला (maharashtra) २१ ते ३० एप्रिल यामध्ये २६ हजार रेमडेसिवीर देण्यात येणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. आता मिळत असलेल्या ३६ हजार इंजेक्शनचा पुरवठा पुढील काही दिवसांत ६० हजार आणि १ मेपर्यंत १ लाखांवर नेण्याचं आमचं नियोजन होतं. परंतु या निर्णयाने उलट राज्यात १० हजार रेमडेसिवीरचा तुटवडा भासणार आहे, असं ते म्हणाले.

हेही वाचा- तुमचं तुम्ही बघा, हेच पंतप्रधानांच्या भाषणाचं सार, शिवसेनेचा टोला

रेमडेसिवीर आयात करू शकत नाही. तो केंद्राचा अधिकार आहे. निर्यातदारांचा साठा वापरू शकत नाही. त्यावर केंद्राचे नियंत्रण आहे. केंद्राने पीएओ स्तरावर रेमडेसिवीर निर्माण करणाऱ्या पेटंट कंपनीशी बोलून महाराष्ट्राचा व देशाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी देखील राजेश टोपे (rajesh tope) यांनी केंद्राला केली

ग्रीन काॅरिडाॅर करा

ऑक्सिजन उपलब्धतेचा कोटा वाटप केंद्र सरकारकडे आहे. ग्रीन कॉरिडॉर करून महाराष्ट्रात जास्तीत जास्त ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा अशी विनंती आम्ही केंद्र सरकारला केली आहे. ऑक्सिजनच्या संदर्भात आपल्याला ऑक्सिजन जनरेटर प्लांटवर किंवा ऑक्सिजन निर्माण होणाऱ्या प्लांटवर अवलंबून राहावं लागणार आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. उद्योगधंद्यांमध्ये देखील पीएसए टेक्नोलॉजीचे प्लांट आहेत. त्यांचा देखील आपण वापर करू शकतो का? याची चाचपणी सुरू असल्याचं राजेश टोपे यावेळी म्हणाले. 

(ncp spokesperson nawab malik slams central government over remdesivir injection distribution)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा