Advertisement

मराठा समाजाचा आता महाराष्ट्र क्रांती सेना पक्ष

गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाकडून, सुरेश पाटील यांच्याकडून नवा पक्ष स्थापन करण्याचे संकेत मिळत होते. मात्र याला मराठा मोर्चा आणि मराठा संघटनांचा विरोध होता. मात्र हा सर्व विरोध डावलत सुरेश पाटील यांनी पाडव्याच्या मुहूर्तावर साताऱ्यातील रायेश्वर मंदिरात नव्या पक्षाची घोषणा केली आहे.

मराठा समाजाचा आता महाराष्ट्र क्रांती सेना पक्ष
SHARES

मराठा आरक्षणासाठी एक मोठं आंदोलन उभारणाऱ्या मराठा समाजाकडून आता नव्या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र क्रांती सेना नावानं पक्ष स्थापण्यात आला असून मराठा क्रांती मोर्चाचा, मराठा संघटनांची विरोध डावलून या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे.


नव्या पक्षाची घोषणा

गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाकडून, सुरेश पाटील यांच्याकडून नवा पक्ष स्थापन करण्याचे संकेत मिळत होते. मात्र याला मराठा मोर्चा आणि मराठा संघटनांचा विरोध होता. अगदी पक्षाला मराठा क्रांती मोर्चा वा सकल मराठा नाव देण्यापासून पक्ष स्थापनेला विरोध होता. मात्र हा सर्व विरोध डावलत सुरेश पाटील यांनी पाडव्याच्या मुहूर्तावर साताऱ्यातील रायेश्वर मंदिरात नव्या पक्षाची घोषणा केली आहे. या पक्ष स्थापनेला मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी रायेश्वर पक्ष बांधणीची शपथ घेत त्यादृष्टीनं कामाला सुरूवातही करण्यात आली.


पक्षाला 'यांचा' पाठिंबा

या पक्ष स्थापनेच्या वेळी महाराष्ट्र क्रांती सेनेच्या बॅनर्सवरील एक फोटो मात्र विशेष लक्ष वेधून घेत होता. हा फोटो होता खासदार उदनराजे भोसले यांचा. या पक्षाला उदयनराजे यांचा संपूर्ण पाठिंबा असल्याचं मानलं जात आहे. तर आगामी निवडणुकीत ते या पक्षाचे उमेदवार असण्याचे संकेतही यावेळी सुरेश पाटील यांनी दिले आहेत. त्यासाठी उदयनराजे यांना आपल्या पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी विनंती केली जाणार असल्याचंही सुरेश पाटील यांनी सांगितलं आहे. या पक्षाच्या माध्यमातून मराठा समाजाचे प्रश्न, समस्या मांडत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर सर्व मराठा संघटनांना, समाजलाा एकत्र आणण्याचाही उद्देश या पक्षाचा असल्याचंही सुरेश पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा