Advertisement

अनिल परब आक्रमक, किरीट सोमय्यांविरोधात १०० कोटींचा दावा दाखल

किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर दहा वेगवेगळ्या घोटाळ्यांची चौकशी सुरू असल्याचा आरोप केला होता.

अनिल परब आक्रमक, किरीट सोमय्यांविरोधात १०० कोटींचा दावा दाखल
SHARES

शिवसेनेचे (shivsena) नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांनी भाजप नेता किरीट सोमय्या यांच्याविरोधात कायदेशीर पाऊल उचलले आहे. परब यांनी सोमय्यांच्या विरोधात १०० कोटींचा दावा दाखल केला आहे. सोमय्या यांनी परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपानंतर अनिल परब यांनी माफी मागण्यासाठी ७२ तासांची मुदत दिली होती. ७२ तास उलटल्यानंतर सोमय्यांनी काही अद्याप माफी मागितली नाही. त्यामुळे आता अनिल परब यांनी सोमय्यांच्या विरोधात रितसर कायदेशीर पाऊल उचललं आहे.

'किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी आणि मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन ७२ तासांत माफी मागण्याचे सूचित केलं होतं. परंतु, त्यांनी माफी मागितली नसल्यानं मी किरीट सोमय्या यांच्या विरोधात उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे' असं परब यांनी जाहीर केलं आहे.

किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर दहा वेगवेगळ्या घोटाळ्यांची चौकशी सुरू असल्याचा आरोप केला आहे. एसटी महामंडळ तिकीट घोटाळा, म्हाडाची जमीन लंपास करणे, दापोलीला अनधिकृत १० कोटींचा रिसॉर्ट बांधणे, आरटीओ ट्रान्सफर घोटाळा, सचिन वाझेचे मुंबई महापालिका कॉन्ट्रॅक्टर घोटाळा, भेंडी बाजारमधील मोठा री-डेव्हलपमेंट प्रकल्प ५० कोटींचा घोटाळा अशा अनेक चौकशी अनिल परब यांच्या विरोधात सुरू असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता.

तसंच, नाशिक पोलीस, लोकयुक्तांकडं अनिल परब यांच्या तीन प्रकरणांची चौकशी सुरू आहे. तसंच सीबीआय, एसीबी, ईडी, एनआयए, अँटी करप्शन देखील या घोटाळ्यांची चौकशी करत आहेत. तसंच राज्यपालांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनिल परब हे दोन महिन्यांचे पाहुणे असल्याचा दावाच सोमय्या यांनी केला होता.हेही वाचा

संजय राऊत यांनी ५५ लाख ढापले, किरीट सोमय्यांचा आरोप

असल्या फडतूस नोटीस आणि धमक्यांना घाबरत नाही : किरीट सोमय्या

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा