Advertisement

संजय राऊत यांनी ५५ लाख ढापले, किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबईत येताच सोमय्या यांनी आपली तोफ शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडे वळवली.

संजय राऊत यांनी ५५ लाख ढापले, किरीट सोमय्यांचा आरोप
SHARES

भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यास मनाई केल्यानंतर ते मुंबईत परतले आहेत. मुंबईत परतताच भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केलं.

मुंबईत येताच सोमय्या यांनी आपली तोफ शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडे वळवली. त्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ५५ लाख रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत.

“शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी काल किरीट सोमय्या यांच्यासोबत जे झाले, त्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही, असे भाष्य केले होते. हे तेच आहेत ज्यांनी बीएमएसी बँकेच्या डीपॉझिटरचे ५५ लाख रुपये ढापले होते. हाच चोरीचा माल त्यांना परत करावा लागला होता,” असं विधान सोमय्या यांनी केलं.

तसंच पुढे बोलताना त्यांनी मी येत्या सोमवारी अलिबागला जाणार आहे. त्या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाने १९ बंगल्याचा घोटाळा केला आहे. याच बंगल्यांची मी अलिबागला जाऊन पाहणी करणार आहे. तसंच येत्या गुरुवारी मी अहमदनगर जिल्ह्यात जाणार आहे. पारणेरमध्ये साखर कारखान्यामध्ये जो घोटाळा झाला आहे, त्याचीही पाहणी करणार आहे, असंही सोमय्या यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले की, मुश्रीफ घोटाळेबाज असून त्यांना मुख्यंत्री उद्धव ठाकरे तसंच उपमुख्यंत्री अजित पवार पाठीशी घालत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

“मी लढत असलेली एक प्रकारची क्रांती आहे. मी आता शांत बसणार नाही. माझी लढाई घोटाळेबाजांविरोधात आहे. मी यांचे घोटाळे बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. ठाकरे सरकारची दादागिरी सुरू आहे. पण ही दादागिरी जास्त दिवस चालणार नाही. पवार आणि ठाकरेंचे मुश्रीफांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण मी आता थांबणार नाही. भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई करावीच लागणार, असंही सोमय्या म्हणाले.

सोमय्या यांनी रेमडेसिवीर इजेक्शनच्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही मुंबई महानगरपालिकेवर केला. रेमडेसिवीरची गरज असल्याचं सांगत मुंबई महापालिकेनं टेंडर काढलं. त्यावेळी हाफकिन इन्स्टीट्यूटनं रेमडेसिवीर प्रती इंजेक्शन ६६५ रुपये घेतले. मात्र मुंबई महापालिकेनं एक इंजेक्शन १ हजार ६६५ रुपयांना दिले. अशाप्रकारे मुंबई महानगरपालिकेने ७७ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन घेतल्या. यात ७७ कोटी रुपये कमावले. हे ७७ कोटी मातोश्रीमध्ये कोणाकोणाच्या खिशात गेले? असा सवाल सोमय्या यांनी केला.



हेही वाचा

पेंग्वीनचा १५ कोटींचा ठेका कुणासाठी? राणेंचं महापौरांना पत्र

असल्या फडतूस नोटीस आणि धमक्यांना घाबरत नाही : किरीट सोमय्या

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा