Advertisement

राष्ट्रवादीतून भाजपात जाण्याच्या चर्चांवर अजित पवारांनी सोडले मौन, म्हणाले...

दोन दिवसांपासून राज्यात याबाबत चर्चा सुरू होती.

राष्ट्रवादीतून भाजपात जाण्याच्या चर्चांवर अजित पवारांनी सोडले मौन, म्हणाले...
SHARES

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अखेर पूर्णविराम दिला आहे. दोन दिवसांपासून राज्यात याबाबत चर्चा सुरू होती. एका आघाडीच्या वर्तमान पत्राने त्यांच्याकडे 40 आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र असल्याचाही दावा केला होता. या सर्व घडामोडींवर अजित पवार यांनी भाष्य केले.

पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले की, राज्यात सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चांना काही अर्थ नाही. कारण नसताना माझ्याबाबत गैरसमज पसरवले गेले.

अजित पवार पुढे असेही म्हणाले की, आपण जे वेगवेगळ्या आमदारांची भेट झाल्याचं दाखवत आहात, ते सर्व विविध कामांनिमित्त आले होते. त्यामुळे या चर्चांना काही अर्थ नाही. या बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. आम्ही सर्व राष्ट्रवादीतच राहणार आहोत. पक्षाने अनेक चढउतार पाहिलेले आहेत. आम्ही राज्यातील प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलं आहे. महागाई असेल, कांदा उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक असेल किंवा अवकाळी पावसामुळे झालेले शेतीचे नुकसान या प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले.

तुम्ही दाखवत असलेल्या बातम्यांमध्ये यत्किंचितही तथ्य नाही. ४० आमदारांच्या सह्या घेण्याचे कारण नाही. आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहोत. कोणी काय मत व्यक्त करावे, हा त्या-त्या राजकीय पक्षाचा अधिकार आहे. आमदार मंत्रालय कामासाठी येतात. आमदार नेहमीच्या पद्धतीने भेटायला येत आहेत. त्यात वेगळा अर्थ काढू नका."

अजित पवार पुढे म्हणाले की, बाबांनो काही काळजी करू नका. शरद पवारांच्या मार्गदर्शन, नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. आजवर अनेक चढउतार आले. मात्र, बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. महत्त्वाचे प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे नेण्याचा हा प्रयत्न आहे. बेकारी, अवकाळी पाऊस, महागाई, नोकर भरती होत नाही. खरेदी केंद्रे अनेक ठिकाणी बंद पडत आहेत. ही केंद्रे सुरू करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे.



हेही वाचा

आदित्य ठाकरेंच्या जवळच्या मित्रानेही सोडली उद्धव ठाकरेंची साथ

15 दिवसात दिल्ली-महाराष्ट्रात दोन मोठे राजकीय भूकंप होणार : सुप्रिया सुळे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा