Advertisement

Maharashtra Political crisis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संवादातील ५ महत्त्वाचे मुद्दे, जाणून घ्या

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले हे जाणून घेऊयात या ५ मुद्द्यातून...

Maharashtra Political crisis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संवादातील ५ महत्त्वाचे मुद्दे, जाणून घ्या
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला संबोधित केले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांना फेसबुक लाईव्हमधून उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले हे जाणून घेऊयात या ५ मुद्द्यातून...

१) मी मुख्यमंत्री पद सोडायला तयार

काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाले असते की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको तर ठिक आहे. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर काय बोलावं....सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा समोर सांगावं.... तुम्ही नालायक आहात, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको, असं तोंडावर सांगावं. मी मुख्यमंत्री पद आणि पक्षप्रमुख पद सोडायला तयार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मला आनंद आहे. पण समोर येऊन सांगा... मी आव्हानांना तोंड देणारा माणूस आहे.

2) 2014 नंतर जे मिळालं ते शिवसेनेमुळेच

2012 साली बाळासाहेब आपल्यातून गेले आणि त्यानंतर 2014 साली आपण एकटे लढलो. तेव्हाही आपण हिंदूच होतो. त्यावेळी ६३ आमदार निवडून आले होते. मधल्या काळात जे काही मिळालं ते शिवसेनेमुळे मिळालं हे लक्षात ठेवा.

3) हिंदुत्वाबद्द्ल विधानसभेत बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री

हिंदुत्वावर बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे. शिवसेना आणि हिंदूत्व एकच, कधीही वेगवेगळे नाही. हिंदुत्व हा आमचा श्वास, अयोध्येला शिवसैनिक गेले. हिंदुत्वाबद्दल बोलणारा विधानसभेत बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे.

4) माझ्यासाठी संख्या विषय गौण

आयुष्याची कमाई पद नाहीत. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. कुटुंब प्रमुख म्हणून मला अनेकांनी सांगितले. ही माझी कमाई. माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या विषय गौण. संख्या कशी जमवता हे नगण्य. मी आपला मानतो त्यांनी मला सांगाव मी मुख्यमंत्री पद सोडतो.

5) शस्त्रक्रियेमुळे भेटणे शक्य नव्हते

माध्यमात अनेक अफवा. मी भेटत नव्हतो. काही दिवस शक्य नव्हते. कारण शस्त्रक्रिया झाली. आता सुरुवात केली. पहिली कॅबिनेट रूग्णालयातून केली.



हेही वाचा

मुख्यमंत्र्यांनी राजिनामा दिल्यास पुढे काय होणार? जाणून घ्या राजकीय गणितं

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा