Advertisement

मुख्यमंत्र्यांनी राजिनामा दिल्यास पुढे काय होणार? जाणून घ्या राजकीय गणितं

उद्धव ठाकरे यांनी राजिनामा दिला तर पुढे कुठले पर्याय असतील हे जाणून घेऊयात.

मुख्यमंत्र्यांनी राजिनामा दिल्यास पुढे काय होणार? जाणून घ्या राजकीय गणितं
SHARES

सध्या महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. अशातच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी काहीव आमदारांसह बंड पुकारला आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात एकच वादळ निर्माण झाला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने...

संजय राऊत यांचे ट्विट पाहता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजिनामा देण्याची शक्यता आहे. महाविकासआघाडीकडे आवश्यक संख्याबळ नसेल तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजिनामा द्यावा लागेल. जर उद्धव ठाकरे यांनी राजिनामा दिला तर पुढे कुठले पर्याय असतील हे जाणून घेऊयात.

जर उद्धव ठाकरेंनी राजिनामा दिला तर पुढे काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यासंदर्भात सध्या तीन शक्यता वर्तवल्या जात आहेत.

१) बहुमत सिद्ध करावं लागेल

ज्यांच्याकडे जास्त संख्याबळ असेल त्यांना राज्यपाल आंमत्रित करतील. कदाचित ते भाजपला बोलावू शकतात. भाजपला बहुमत सिद्ध करावं लागले. तेव्हा एकनाथ शिंदेचा ३५-४० आमदारांचा गट सोबत येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंच्या गटाला सोबत घेऊन भाजपा बहुमत सिद्ध करू शकते.

२) मध्यवर्ती निवडणुका होण्याची शक्यता

राज्यपाल केंद्र सरकारला शिफारीश करू शकतात की, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी. राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर मध्यवर्ती निवडणुका घेण्याची मागणी होऊ शकते.

३) सध्याच्या सरकारला मुदत देतील

राज्यपाल सध्याच्या सरकारला काही दिवसांची मुदत देतील. या कालावधीत महाविकास आघाडी सरकारला आपलं बहुमत पुन्हा सिद्ध करावं लागेल.हेही वाचा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे संकेत? संजय राऊतांचं खळबळजनक ट्विट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह, नाना पटोलेंची माहिती

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा