Advertisement

अजित पवार अजूनही राष्ट्रवादीचे गटनेते, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल

राज्याचे उपमुख्यमंत्री ​अजित पवार​​​ अजूनही राष्ट्रवादीचे गटनेते आहेत आणि त्यांनी दिलेला व्हिप सर्व आमदारांसाठी बंधनकारक असेल.

अजित पवार अजूनही राष्ट्रवादीचे गटनेते, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
SHARES

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अजूनही राष्ट्रवादीचे गटनेते आहेत आणि त्यांनी दिलेला व्हिप सर्व आमदारांसाठी बंधनकारक असेल. त्यांनी सांगितल्यानुसारच राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मतदान करावं लागेल’, असा दावा भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. दानवे यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावरही खाेचक शब्दांत टीका केली. 

मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दानवे म्हणाले, विधानसभा निवडणुकीचा निकालागूनही राज्यात अस्थिर वातावरण निर्माण झालं होतं. तेव्हा राज्यपालांनी सर्वप्रथम भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं. परंतु पुरेसं संख्याबळ नसल्याने भाजपने सरकार स्थापन करण्यात असमर्थता दर्शवली. त्यानंतर राज्यपालांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही निमंत्रण दिलं. परंतु तिघांपैकी कुठल्याही पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. तेव्हा राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. यामुळे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे आणखी हाल झाले. सरकारच अस्तित्वात नसल्याने त्यांना तात्काळ मदत करणं शक्य नव्हतं. शेतकऱ्यांचं हित डोळ्यापुढं ठेवून राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते अजित पवार आणि भाजपने मिळू सत्ता स्थापन केली.   

राज्यपालांनी घटनेच्या चौकटीत राहून निर्णय घेतला नाही, या विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना दानवे यांनी सांगितलं, भाजपचं संख्याबळ (१०५) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची (५४) सही असलेलं पत्र दिल्यानंतरच राज्यालांनी राष्ट्रपती राजवट मागे घेण्याची शिफारस केली आणि सरकार स्थापन करण्याची संधी दिली. राज्यपालांनी घटनात्मक चौकटीत राहूनच निर्णय घेतले. राहीला प्रश्न अजित पवारांचा तर ते त्यांनी पाठिंब्याचं पत्र दिलं तेव्हा ते गटनेते होते आणि त्यांना पूर्ण अधिकार होता. राजकीय घडामोडी घडून अजित दादांना गटनेतेपदावरुन काढल्याचा दावा त्यांनी (राष्ट्रवादी) केला असला तरी आजही अजित पवारच गटनेते आहेत. अजित दादा देतील तोच व्हिप राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना लागू होणार आहे. यात कोणताही गैरसमज असण्याचं कारण नाही’, असा दावाही दानवेंनी केला. 

संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करताना त्यांनी सांगितलं की, आम्ही सत्तेत आहोतच. पण सत्ता येण्याआधीच संजय राऊतांना वेड लागलं आहे. त्यांना आता वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे. काय बोलावं आणि काय बोलू नये हे त्यांना आत्ताही कळत नाही.


हेही वाचा-

याचसाठी होता अट्टाहास.? सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना ‘क्लीन चीट’

महाविकास आघाडीचाही सत्तास्थापनेसाठी दावा, दिलं १६२ आमदारांच्या सह्यांचं पत्र



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा