Advertisement

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी महिनाभर लांबणीवर

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी आता महिनाभर लांबणीवर गेली आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी महिनाभर लांबणीवर
SHARES

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis) सुनावणी आता महिनाभर लांबणीवर गेली आहे. पुढची सुनावणी आता 1 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मंगळवारी या प्रकरणावर महत्त्वाची सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला (Election Commission Of India) पक्षचिन्हावर निर्णय घेण्याची मुभा दिली होती.

राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी ही सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर झाली. आता या सुनावणीची पुढची तारीख ही दिवाळीनंतर म्हणजे 1 नोव्हेंबर रोजी आहे.

ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या आहेत. नवरात्रीची नऊ दिवसांची सुट्टी आणि त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज आता पुढे जाणार हे स्पष्ट होतं.

राज्यातील सत्तासंघर्षाचा प्रश्न हा 21 आणि 22 जून रोजी सुरु झाला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं. आतापर्यंत तीन बेंचकडे हे प्रकरण गेलं. सुरुवातीला व्हेकेशन बेंचसमोर याची सुनावणी झाली. त्यानंतर तत्कालीन सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या बेंचकडे यावर सुनावणी सुरू झाली. त्यानंतर यावर पाच न्यायाधीशांचे एक घटनापीठ तयार करण्यात आलं. यावर मंगळवारी महत्त्वाची सुनावणी झाली.हेही वाचा

उद्धव ठाकरेंची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी, निलेश राणेंची जीभ घसरली

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

संबंधित विषय
maharashtra politicsmaharashtrashiv senaeknath shindebjpuddhav thackeraydevendra fadnavisMaharashtra Political Crisislatest marathi newsnavratri 2022महाराष्ट्र न्यूज लाइव्हमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र शिवसेना निवडणूक चिन्हनिवडणूक आयोगाची सुनावणीब्रेकिंग न्यूजमनोरंजन विश्वातील घडामोडीमुंबई-पुण्यातील बातम्याहवामानाचे अपडेटएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेरेन न्यूजशिवसेना आणि शिंदे गटमुंबई न्यूजमुंबई रेन न्यूजपाऊसहवामान महाराष्ट्रहवामानहवामान अंदाजमहाराष्ट्र न्यूज मराठीमहाराष्ट्रातील राजकारणशिवसेनाभाजपामराठी न्यूजउद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदेघटस्थापनादसरा मेळावा २०२२महाराष्ट्र नवरात्री उत्सव २०२२गरबा २०२२नवरात्री दांडिया महाराष्ट्र मराठी बातम्या
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा