Advertisement

SIDनं सरकारला दोन महिन्यांपूर्वीच दिलेली बंडखोरीची कल्पना

एसआयडीने (SID) एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची पूर्वकल्पना दिली होती.

SIDनं सरकारला दोन महिन्यांपूर्वीच दिलेली बंडखोरीची कल्पना
SHARES

राज्य गुप्तचर विभागाने अर्थात एसआयडीने महाराष्ट्रातील राजकीय संकटाची (Maharashtra political Crisis) कल्पना दोन महिन्यांपूर्वीच सरकारला दिली होतील. शिवसेनेचे (Shiv Sena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह आठ ते दहा आमदार विरोधी पक्षाच्या संपर्कात होते, अशी गोपनीय माहिती एसआयडीच्या अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वीच दिली होती. असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे.

एसआयडीने (SID) एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची पूर्वकल्पना दिली होती. अशा परिस्थितीत एसआयडीच्या मदतीने काहीतरी पावलं उचलायला हवी होती. परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

अनेक वेळा राजकारण्यांचे विशेष सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त केलेल्या पोलीस अधिकार्‍यांकडून राज्य पोलिसांना गुप्तचर माहिती देखील मिळते, असं देखील इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीत म्हटलं आहे.

राज्यातील संभाव्य घडामोडींवर लक्ष ठेवणे, राजकीय घडामोडी आणि हालचाली, गुन्हे तसेच समाजकंटक, दहशतवादी आणि माओवादी कारवायाबद्दल आगाऊ सूचना देणे हे एसआयडीचं काम आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी राज्य गुप्तचर विभागाची स्थापना केली.

दरम्यान, राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील राजकारणावर या बंडाचा थेट परिणाम होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 40 आमदार असल्याचं म्हटलं जात आहे.

एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह स्वतंत्र गट बनवणार असल्याचं समजतं. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक आमदारांचा मुक्काम सध्या आसामच्या गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसनमध्ये आहे.



हेही वाचा

एकनाथ शिंदेंवर आनंद दिघेंचे कुटुंब नाराज; म्हणाले “दिघे साहेब असते तर गद्दारी…”

महाराष्ट्रावर वार! एकनाथ शिंदेंच्या मानगुटीवर बसून भाजपचं 'ऑपरेशन कमळ', सामनातून टिका

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा