Advertisement

भुजबळ झाले सोशल मीडियावर 'अॅक्टिव्ह'

भुजबळांनी नव्यानं आपलं ट्विटर अकाऊंट उघड असून या अकाऊंटवरून काही वेळापूर्वीच भुजबळांनी पहिलं ट्विट केलं आहे. @ChhaganCBhujbal या नावानं भुजबळांचं ट्विटर हँडल असून त्यांनी अजूनपर्यंत कुणालाही फाॅलो केलेलं नाही.

भुजबळ झाले सोशल मीडियावर 'अॅक्टिव्ह'
SHARES

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून तुरूंगात असलेल्या छगन भुजबळांची पंधरा दिवसांपूर्वी जामिनावर सुटका झाली. भुजबळ तुरूंगातून बाहेर आल्याबरोबर ते राजकारणात सक्रिय होत आपल्या नव्या इनिंगला सुरूवात करतील अशी चर्चा रंगली. पण भुजबळांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे नवी इनिंग सुरू करायला थोडा वेळ लागतो आहे. डाॅक्टरांनी आराम करायचा सल्ला दिल्यानं भुजबळ आणखी काही दिवसांनंतर राजकारणात सक्रिय होतील.

कार्यकर्त्यांशी साधला संवाद


भुजबळ राजकारणात सक्रिय होतील तेव्हा होतील पण ते त्याआधी सोशल मीडियावर मात्र सक्रिय झाले आहेत. भुजबळांनी नव्यानं आपलं ट्विटर अकाऊंट उघड असून या अकाऊंटवरून काही वेळापूर्वीच भुजबळांनी पहिलं ट्विट केलं आहे. आपल्यावर विश्वास दाखवत आपल्या नेहमीच साथ देणार्या कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले या ट्विटच्या माध्यमातून मानले आहेत. तर देशाच्या कानाकोपर्यांतील कार्यकर्त्यांना आपल्याला भेटण्यास उत्सुक असून वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचंही भुजबळांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.



@ChhaganCBhujbal या नावानं भुजबळांचं ट्विटर हँडल असून त्यांनी अजूनपर्यंत कुणालाही फाॅलो केलेलं नाही. असं असलं तरी काही तासांतच त्यांचे ४१८ फाॅलोर्स झाले असून ते मिनिटामिनिटाला वाढत आहेत. तर त्यांच्या पहिल्या ट्विटला तीन तासांत २५० लाईक्स आहेत तर ५७ जणांनी रिट्विट केलं आहे.
 
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा